डोक्यावरचे केस गळताहेत ? मग हा उपाय करा...

तुमच्या केसांचा पोत कसा आहे त्यावरून तुमचे आरोग्य कसे आहे हे कळू शकते. तज्ञांच्या मते तुमच्या केसांची स्थिती तुमच्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकते. कारण आपल्या केसांतील मायक्रोसर्क्युलेशन’, आपल्या शरीरातील हॉर्मोन्स च्या संतुलनावर आणि शरीराला मिळणाऱ्या पोषणावर अवलंबून असते. आपले केसअगदी सूक्ष्म प्रमाणात का होईनापण आपल्या शरीरातील कमतरता दर्शवित असतात. केस गळणे किंवा केस पातळ होणे हे मोठ्या समस्येचे सूचक असू शकते.

केस गळणे आणि त्याजागी नवीन केस येणे ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. त्यामुळे दररोज ऐंशी ते शंभर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण केसगळती जेव्हा यापेक्षा जास्त होऊ लागतेतेव्हा शरीरामध्ये असणाऱ्या कोणत्यातरी कमतरतेमुळे केस गळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्यामागे अनेक तऱ्हेची कारणे असू शकतात.
जर दाट असेलेले केस पातळ होत चालले असतीलतर तुमची जीवनशैली याला जबाबदार असू शकते. वारंवार केसांवर करविल्या जाणाऱ्या रासायनिक ट्रीटमेंटकेसांची अपुरी निगाहॉर्मोन्स चे असंतुलनआणि पोषणाची कमतरता या कारणांमुळे केस पातळ होऊ लागतात. वाढत्या वयानिशी देखील केसांचा दाटपणा कमी होत जातो. केस पातळ होण्यामागे नक्की कोणते कारण असू शकेल हे जाणून घेण्याकरिता अनेक प्रकारच्या तपासण्या उपलब्ध आहेत. एकदा कारण स्पष्ट झाले की मग त्यावर उपाययोजना करणे शक्य होते.
जर केसांमध्ये स्प्लीट एन्ड्स होत असतीलम्हणजेच केस जर टोकाशी दुभंगत असतीलतर हे रोखण्याकरिताही उपचारांची गरज आहे. केस दुभंगण्याची अनेक करणे असू शकतात. हेअर स्टायलिंग करताना हिट प्रोटेक्टंट चा वापर न करता हिट ट्रीटमेंट करविणेब्लो ड्रायरचा अतिवापरकेसांमध्ये आर्द्रतेची कमतरताया मुळे केस टोकांशी दुभंगताना आढळतात.
तसेच केस रुक्ष किंवा अतिशय कोरडे असणेहे हॉर्मोन्स च्या असंतुलनाचे लक्षण असू शकते. ह्यावर तज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करता येते. केस अकाली पांढरे होणे हे शरीरामध्ये ब जीवनसत्वाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. तसेच थायरॉइड मधील असंतुलनामुळे देखील केस अकाली पांढरे होऊ शकतात. ह्या समस्यांचे निदान जर योग्य वेळी झालेतर आवश्यक ते औषधोपचार करून या समस्या संपुष्टात आणता येऊ शकतात.
अनुवांशिकताएखादा आजारशरीरामध्ये असणारी लोहाची कमतरतामानसिक किंवा शारीरिक तणावकिंवा हवामानातील बदलामुळे ही केस प्रमाणाबाहेर गळू शकतात. थायरॉइड च्या असंतुलनामुळेही केस गळू शकतात. तसेच प्रसूतीनंतरह महिलांमध्ये केस गळतीचे प्रमाण वाढते. ही केसगळती रोखण्यासाठी शरीराला लोहाची आवश्यकता असते. शरीरामध्ये हिमोग्लोबिन सामान्य असलेतरी लोहाची कमतरता असू शकते. अनेकदा शरीराला प्रथिनांचे पोषण न मिळाल्यामुळे देखील केसगळती उद्भवू शकते.
त्यामुळे जर मोठ्या प्रमाणावर केस गळती होत असेलतर रक्ताची तपासणी करून घेऊन शरीरामध्ये कोणत्या पोषक घटकाची कमतरता आहेहे समजून घेता येतेतसेच आहारतज्ञांचा साला घेऊन आपल्या आहारामध्ये सुधारणा करून घेऊन शरीराला आवश्यक ते पोषण मिळेल याची काळजी घेता येऊ शकते. 

Post a Comment

Previous Post Next Post