रियाची केस घेणारे, ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील

जाणून घ्या,  ऍड. सतीश माने- शिंदे यांच्याबद्दल  रोचक माहिती




मुंबई -  सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तीची केस घेणारे प्रसिद्ध वकील ऍड. सतीश माने- शिंदे हे भारतातील सर्वात महागडे वकील म्हणून ओळखले जातात.  ऍड.  माने - शिंदे यांनी अनेक बहुचर्चित आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये वकिली केली आहे. यामुळे लोक त्यांच्याबद्दल वेगवेगळे विचार मांडत असले ते आज  सर्वात महागडे ‘सेलिब्रेटी लॉयर’ बनले आहेत.



गेल्या काही दिवसांपासून ऍड.  सतीश माने- शिंदे परत चर्चेमध्ये आले आहेत कारण, सुशांत सिंग राजपूत  प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीने त्यांना आपला वकील म्हणून नेमले आहे. सतीश माने - शिंदे हे सामान्यतः हाय प्रोफाईल केसच घेतात हे त्यांच्या आजपर्यंतच्या केसेस बघितल्यावर कळते आणि यामुळेच ते भारतातील सर्वात महागडे सेलिब्रेटी वकील आहेत.

कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेले सतीश माने - शिंदे हे आज भारतातील एक ‘हाय प्रोफाईल क्रिमिनल लॉयर’ म्हणून ओळखले  जातात. सतीश माने- शिंदे यांनी त्यांची एलएलबीची पदवी हि ‘कर्नाटका युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ येथून मिळवली होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वकिलीमध्ये करिअर बनवण्यासाठी १९८३ मध्ये मुंबईला आले. येथूनच त्यांचा सर्वात महागडे वकील बनण्याचा प्रवास सुरु झाला होता. त्यांनी प्रसिध्द वकील रामजेठ मलानी यांच्या सोबत जुनिअर लॉयर म्हणून तब्बल दहा वर्षांपर्यंत इंटर्नशिप केली होती.

रामजेठ मलानी हे त्याकाळी भारतातील सर्वात महागडे वकील होते त्यांची फीस २५ लाख पर अपिरेंस एव्हढी होती. रामजेठ मलानी यांनी देशातील मोठ मोठ्या नेत्यांचे प्रकरने न्यायालयात निकाली लावले होते. मलानी यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे हत्या प्रकरण, लालूप्रसाद यादव, बीएस येदयुराप्पा, जयललीथा, हर्षद मेहता स्टोक मार्केट घोटाळा, लालकृष्ण अडवाणी, आसाराम बापू यांसारखे अनेक बहुचर्चित प्रकरने हाताळली होती.



सतीश मानेशिंदे यांच्या जीवनात सर्वात मोठा बदल झाला तो बॉलीवूड मधील प्रसिध्द अभिनेता संजय दत्त याची १९९३ मधील बॉम्बस्फोट केस त्यांना मिळाल्या नंतर. हे प्रकरण हाताळल्यामुळे त्यांचे करिअर हे यशाच्या शिखरावर पोहचले होते आणि ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. सर्वांनाच माहित आहे या प्रकरणामध्ये संजय दत्तला शिक्षा पण झाली होती. या केसनंतर सतीश माने-शिंदे यांना मोठमोठ्या सेलिब्रिटी कडून अटेंशन मिळू लागले. यानंतर त्यांनी अभिनेता सलमान खान याचीही केस हाताळली होती.

यासोबतच सतीश मानेशिंदे यांनी मोठमोठ्या राजानेत्यांची मोठमोठी प्रकरने हाताळली आहेत जशे कि, मुंबई पोलीस इन्स्पेक्टर दया नायक यांची केस, शोबन मेहता मॅच फिक्सिंग केस, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची पत्नी सुजाता निकलजे हिची केस, बिंदू दारा सिंग याची बेटिंग केस, एव्हढेच नाही तर त्यांनी राखी सावंतची सुसाईड अबेटमेंटची केस सुद्धा हाताळली होती.सतीश मानशिंदे यांच्याबद्दल असेही म्हटले जाते कि त्यांची बोलण्याची शैली हि सर्वांपेक्षा वेगळी आहे त्यासोबतच ते ज्याप्रमाणे साक्ष आणि पुरावे न्यायाधीशासमोर मांडतात हे त्यांच्या सफलतेचे सर्वात मोठे कारण आहे. कोर्टात त्यांचा बोलण्याचा अॅटीट्युड हा त्यांना सर्वात युनिक बनवतो.


दहा वर्ष पहिले मानेशिंदे हे १० लाख रुपये फीस पर हेअरिंग साठी घेत होते. आजच्या वेळी त्यांची फीस किती आहे हे कोणालाही माहित नाही परंतु काही लोकांच्या मते त्यांची आजची फीस हे २० ते २५ लाख पर हेअरिंग एव्हढी असू शकते. त्यांची आजची संपती हि ६०० ते ७०० कोटी रुपये एव्हढी आहे असेही सांगितले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने