मुंबई : दक्षिण-आशियाई कंटेंटसाठी जगातील अग्रेसर ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या यपटीव्हीने ड्रीम११ इंडियन प्रीमियर लीग २०२० मधील ६० सामन्यांचे हक्क मिळवले आहेत. १० पेक्षा अधिक प्रांतांमध्ये हा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सामन्यांचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवेल. लॉकडाऊन असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्रीडा चाहते घरी बसूनच ड्रीम११ इंडियन प्रीमियर लीग २०२० चा आनंद घेतील. भरपूर फॅन फॉलोइंग आणि अफाट प्रेक्षकसंख्या असलेल्या ड्रीम११ आयपीएलमुळे यपटीव्हीला जागतिक स्तरावरील प्रेक्षकांचे प्रचंड आकर्षण मिळवण्यास मदत होईल.
या ओटीटी मंचावर १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० पर्यंत ड्रीम११ इंडियन प्रीमियर लीग २०२० चे प्रक्षेपण दाखवले जाईल. याच संधीचा लाभ घेत यपटीव्ही ऑस्ट्रेलिया, कॉन्टिनेंटल युरोप, मलेशिया, दक्षिण पूर्व आशिया (सिंगापूर वगळता), श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, मध्य आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथे ड्रीम११ इंडियन प्रीमियर लीग २०२० चे थेट प्रक्षेपण दाखवणार आहे.
यपटीव्हीचे संस्थापक आणि सीईओ श्री उदय रेड्डी म्हणाले, “ मागील काही वर्षांमध्ये आयपीएल ही देशातील सर्वात आवडती क्रिकेट स्पर्धा बनली आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांमध्ये एक नवा उत्साह, आशावाद आणि क्रेझ दिसून येईल. आपीएलचा लाइव्ह अनुभव, समर्पित तंत्रज्ञानाद्वारे पाहण्याचा अनुभव आणि तत्काळ व्हर्चुअल अनुभव याद्वारे यावर्षीच्या चाहत्यांना गर्दीतील स्टेडियमपेक्षा घरात राहून सुरक्षिततेचा अनुभव मिळेल. या हक्कांद्वारे यपटीव्हीला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल.”
टिप्पणी पोस्ट करा