“चिंचेच्या झाडाखालील ‘पत्रकारी’ गाढवगिरी”

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ असलेल्या प्रसिद्ध चिंचेच्या झाडाखाली रोजचेच दृश्य.  एक कारकून गाढव आणि दुसरं ‘न लिहिता येणारे’ गाढव उभे होते. 

कारकून गाढव: ( धापा टाकत ) “आपण बातमीसाठी पैसे घेतो,  याची चर्चा आता गावभर नव्हे घरापर्यंत पोहचली रे.".. 

न लिहिता येणारे गाढव: “मग तू असं कर, मी मॅटर पाठवतो, तू घरात बसून बातम्या बनव. तू फिल्डवर येऊच नको... 

कारकून गाढव: “ मग माझा हिस्सा?”

न लिहिता येणारे गाढव: (कान हालवत) “नेहमीप्रमाणे! काय हरकत आहे?”

कारकून गाढव: “म्हणजे? तू किती घेतलंस हे कळणार तरी कसं?”

न लिहिता येणारे गाढव: “अरे आम्ही गद्दारी करणारे नाही! आम्ही चांगले गाढव आहोत!”

कारकून गाढव: “हूं! मग मी रेस्ट हाऊसच्या छायेखाली बसतो,  तिथं बसूनच मोबाईल चार्ज करता येईल... .आजकल चार्जिंगपण लवकर उतरत आहे. 

न लिहिता येणारे गाढव: “तुझी बॅटरी आधीच संपलेली आहे… मोबाईलची नाही, मेंदूची!”

कारकून गाढव: “बोलून दाखवू नको! माझ्यामुळे तुझी पत्रकारिता आजही चालते आहे हे लक्षात ठेव!”

न लिहिता येणारे गाढव: “पण माझ्यामुळेच तुला पेड न्यूजचे पैसे मिळतात, हे विसरू नको!”

इतक्यात गोंधळात एका बाईनं प्रवेश केला, केस विस्कटलेले, हातात पिशवी, तोंडावर राग,  गाढवांकडे बघत म्हणाली...

ती बाई: “ए गाढवांनो! हजार दिलेत, पण अजूनही माझ्या शेजाऱ्यावरची बदनामीची बातमी टाकली नाहीस! तू काय पत्रकार की पांढऱ्या ढेकणाचा एजंट?”

कारकून गाढव भांबावून बघतं आणि, "माझं काही चुकलं नाही, मी तर फक्त सहज आलो होतो!" असं म्हणून सरळ रेस्ट हाऊसकडे पळ काढतो...

शेवटी त्या चिंचेच्या झाडाखाली शांतता...
पण बातम्या, बॅटऱ्या आणि बॅंक अकाउंटचं गाढवगिरी नाटक मात्र सुरूच राहतं!


संदेश:
आजच्या काही पत्रकारितेचा चेहरा बदलला नसून, त्यात गाढवगिरीनेच नवा ट्रेंड आणलाय...
पैशासाठी बातम्या, झाडाखाली डील, आणि फिल्डवर नाही पण रेस्ट हाऊसवर सक्सेस!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने