साखर कमी खा आणि चांगले बदल अनुभवा

आपले आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आहारातील साखर कमी करण्याचा सल्ला नेहमी वैद्यांकडून दिला जातो. साखर म्हणजे केवळ गोड पदार्थ नसूनज्या पदार्थांमध्ये एडीबल शुगर्स असतात त्या सर्व पदार्थांचे माफक सेवन केले जाणे आवश्यक आहे. यामध्ये गोड पदार्थांच्या व्यतिरिक्त मैदास्टार्चयुक्त पदार्थफळांचे प्रोसेस्ड रसप्रोसेस्ड अन्नपदार्थ अशा सर्व पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांचे सेवन कमी केल्यानंतर काहीच दिवसांमध्ये शरीरामध्ये निश्चित बदल दिसून येऊ लागतात.

साखर खाल्ल्याने मेंदू सक्रीयसचेत होऊन नैराश्यपूर्ण मनस्थिती सुधारून उत्साह संचारतोथोडक्यात मूड सुधारतो असे सामान्यपणे म्हटले जात असलेतरी आहारतज्ञांच्या मते जास्त साखर खाल्ल्याने नैराश्य येण्याची शक्यता ही अधिक असते. मनस्थिती सुधारण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या आईस्क्रीमचॉकोलेट किंवा तत्सम गोड पदार्थांनी मनाला तात्पुरती उभारी येत असलीतरी हा शुगर रशचा प्रकार असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. एकदा का हा शुगर रश संपलाकी शरीरातील उत्साह आणि मनाची उभारी दोन्ही चटकन नाहीसे होतात. त्याउलट आहारातील साखर कमी केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होऊन मनही प्रफुल्लित रहात असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. साखर सोडल्यापासून अवघ्या एका आठवड्यामध्ये हा बदल दिसून येतो
आतातर काही देशांत साखरेच्या पोत्यावरहीजास्त साखर खाल्ल्याने आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकत असल्याची सूचना लिहिलेली असणे सरकारच्या वतीनेच बंधनकारक करण्यात आले आहे. लोकांनी आहारातील साखर कमी करावी या साठी जगामध्ये किती तरी देशांमध्ये शुगर टॅक्स’ लावण्यात येत आहे. परिणामी साखरेच्या अतिसेवानाने होणाऱ्या अपायांच्या बाबतीत लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण होऊन आता लोक साखरमुक्त आहाराला पसंती देत आहेत.

आहारातील साखर कमी केल्याने त्वचेवर अकाली आलेल्या सुरकुत्या कमी होतात. आहारामध्ये साखर जास्त असलीतर त्यामुळे शरीरामध्ये ग्लायकेशन’ नामक प्रक्रिया घडून येत असते. यामध्ये साखरेचे मॉलिक्युल्स’ त्वचेतील कोलाजेनला चिकटून रहात असूनत्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते आणि त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळे आहारामधून साखरेचे प्रमाण कमी केल्यास त्वचा तरुण दिसू लागते. तसेच शरीरातील ग्लुकोज आणि इंस्युलीनच्या पातळींमध्ये होणारे चढ-उतारही आपोआपच कमी होत असूनशरीरावर सातत्याने दिसून येणारी सूजही कमी होऊ लागते. 

Post a Comment

Previous Post Next Post