राज्यात लवकरच महिला पोलीस स्टेशन उभारण्यात येणार

मुंबई- राज्यात लवकरच सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांसाठी पोलीस ठाणे उभारले जाणार, त्यामध्ये सगळ्या अधिकारी आणि कर्मचारी या महिलाच असतील अशी महत्त्वापूर्ण घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 
 विधिमंडळात अर्थसंकल्प सादर  करताना   अजित पवार यांनी   आज  ही घोषणा केली. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार संपले पाहिजेत यासाठी हे सरकार कटीबद्ध आहे. तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदोरी चौकात शिक्षिकेला  एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून जाळण्यात आले, त्यानंतर राज्यात तीव्र  प्रतिक्रिया उमटली होती. यानिमित्त महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. 
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’सारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती  गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात  दिली होती. त्यादृष्टीने सरकार पाऊले उचलत आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने