‘डेक्कन क्वीन’ सुसाट वेगाने धावणार...

पुणे-मुंबई-पुणे मार्गाव धावणारी दख्खनची राणी अर्थात  डेक्कन क्वीन मध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आंतरबाह्य बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला  असल्याचे समजते. एक जूनपासून म्हणजेच तिच्या वाढदिवशी या गाडीला अत्याधुनिक असा 'एलएचबीकोच (लिंक हॉफमन बुश) लावला जाणार आहे. बदलत्या डब्यांमुळे ही गाडी ताशी १४० किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे.
या गाडीचा ताशी वेग सध्या १२० किलोमीटर आहे. तरनवीन बदलांनतर तो १४० किलोमीटर होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी सव्वातीन तासांपासून पावणेतीन तास होणार आहे. शिवाय डब्ब्यांच्या संख्येतही वाढ करणार आहे. सध्याच्या १७ डब्यांऐवजी ती २० डब्यांसह धावणार आहे. त्यामुळे अधिकसंख्येने माणसे प्रवासाचा आनंद आरामात घेऊ शकतील.
डेक्कन क्वीन ची बाह्यरचना बदलण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) या संस्थेमार्फत गाडीच्या 'कोच'चे डिझाइन कसे असेलयाचा तपशील ही संस्था १५ मार्चपर्यंत रेल्वे प्रशासनाला सादर करणार आहे. साधारण पाच 'डिझाइन'पैकी एक डिझाइन निश्चित केले जाणार आहे.   
 दरम्यानडेक्कन क्वीनच्या 'एलएचबीकोचची निर्मिती चेन्नई येथील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी'त करण्यात येत आहे. हे कोच वजनाने हलके असल्याने अपघात झाल्यास जीवितहानी टळू शकणार आहे. यामुळे प्रवासी सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने