SBI च्या YONO ने गाठला गाठला विक्रमी टप्पा

स्टेट बँक ऑफ इंडियाचा SBI डिजिटल सेवा प्लॅटफॉर्म म्हणजेच योनो एपच्या यूजर्समध्ये मोठ्या संख्येनं वाढ झाली आहे. 2017 मध्ये सुरू झाल्यापासूनच योनोला यूजर्समध्ये सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म म्हणून पसंती मिळत आहे. योनो म्हणजेच 'यू ओन्ली नीड वन'. या योजनेनं 200 लाख नोंदणीकृत युजर्सचा टप्पा गाठला आहे. यात कॅशयोनो ग्लोबल आणि योनो कृषीयोनो शॉपिंग फेस्टिवहल यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये बँकिंगखरेदीजीवनशैली आणि गुंतवणुकविषयीच्या सर्व गरजा पूर्ण करता येतात.

एसबीआयने योनोवर आतापर्यंत 6.8 दशलक्ष एसबी खाती सुरू केली आहे. केवळ दोन वर्षांत योनो एसबीआयने 20 वेगवेगळ्या विभागांत 100 पेक्षा जास्त ई- कॉमर्स कंपन्यांशी भागिदारी केली आहे. ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतील असे विविध एसबीआयने योनोच्या (SBI YONO) माध्यमातून सुरू केले असल्यानं याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


ग्राहकांना फक्त केवायसीसाठी बॅंकेच्या खात्याला भेट देऊन 24x7 चालणारे योनो - डिजिटल बचत खाते सुरू करता येतं. योनो एसबीआयच्या माध्यमातून बँक दररोज 20000 खाती उघडते. योनो कॅशने आतापर्यंत एटीएम आणि मर्चंट आउटलेटसवरील 250000 टचपॉइंट्सवरून सुरक्षित व्यवहार केले आहेत. दशलक्ष व्यवहार हे एटीएम कार्डशिवाय केले आहेत. बँकेने गेल्या दोन वर्षांत लाख एसबीआय क्रेडिट कार्ड्सही वितरित केली आहेत.

केवळ 27 महिन्यांत योनो एसबीआयने ग्राहकांना लाख जीवन विमा योजना आणि योनो कृषी अग्री सोने कर्ज म्युच्युअल फंड्सची विक्री केली आहे. 200 लक्ष नोंदणीकृत ग्राहकांचा टप्पा हे ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास असल्याचं एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटल आहे. योनो एसबीआय डिजिटल रुपांतरणाच्या मार्गावर असल्याची माहिती त्यांनी दिली.


योनोच्या माध्यमातून स्थापनेपासूनच एसबीआयने सुरू 6.8 दशलक्ष खाती केली.योनोचे डाउनलोड्स 430 लाखांच्या पुढे आहेत.बँकिंग आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्मवर दररोज 45लाखांवर लॉगइन्स होतात.योनो कॅशयोनो ग्लोबल आणि योनो कृषी असे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत.आतापर्यंत 3.4 लाख योनो अ‍ॅग्री सोने कर्जाचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post