तीन गाढवांनी अनेक षडयंत्र केले, कपट कारस्थान केले , खोट्या अफवा उठवल्या तरी घोडा आणखी वेगाने धावत होता. एक गाढव तर मनातून पार खचून गेलं होतं, सगळीकडे अपयश आल्यामुळे त्या गाढवाच्या डोक्यात एकाच गोष्टीचा विचार सुरू होता – "घोड्याला कसं हरवायचं?"
नव्या साहेबाने ढुंगणावर लाथ मारल्यामुळे गाढव सॉलिड दुखावलं. दुखावलेलं मन शांत करण्यासाठी ते गाढव आणखी मद्य प्राशन करू लागलं. दारूच्या नशेत घोड्याला हरवण्याचे हजारो प्लॅन सुचत होते, पण तेवढ्यातच त्याला एक नवा सोबती मिळाला – खोक्या नावाचा बकरा!
बकरा भेटला, गाढवाचं नशीब खुललं?
बकरा काही साधासुधा नव्हता. तो एका लोकप्रतिनिधीचा बकरा होता. चारा खाऊन फुगलेला, थोडासा वजनदार, आणि कायम झिंगलेला.दिसेल त्या शेळीच्या मागे लागणारा.
गाढवाला वाटलं – "अरे, हा तर आपल्यासारखाच! दोघे मिळून घोड्याला धडा शिकवू!"
गाढव आणि बकरा यांनी तात्काळ दोस्ती केली आणि एकत्र मद्य प्राशन सुरू केलं.
दारूच्या ग्लासात मनसोक्त बुडून, गाढव आणि बकरा घोड्याच्या बदनामीचा प्लॅन आखू लागले.
बकरा खोक्या म्हणाला –"अरे गाढवा, लोकप्रतिनिधीला फूस लावूया. त्याच्या कानात खोटं भरूया आणि घोड्याविरुद्ध बदनामीचं पत्र लिहूया!"
गाढवाला कल्पना मस्त पटली. ते दोघं लोकप्रतिनिधीला भेटले आणि त्याच्या कानात गोड गोड बोलू लागले.
बदनामीचं पत्र आणि व्हायरल कांड
गाढवानं बकऱ्याच्या मदतीनं लोकप्रतिनिधीच्या नावाने एक बदनामीचं पत्र तयार केलं.
त्यात लिहिलं होतं –
"घोडा हा भ्रष्ट आहे. त्यानं लोकांची दिशाभूल केली आहे. त्याला सगळीकडे पायबंद करावं!"
हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं. गाढव आणि बकरा आनंदाने नाचू लागले.
- गाढव: "अरे बकरा, आता घोड्याचं खेळ खलास!"
- बकरा: "हो रे, लोकप्रतिनिधी तर आपल्या बाजूला आहे!"
लोकप्रतिनिधीचा यूटर्न आणि बकर्याची कत्तल
पण झालं काय?
पत्र व्हायरल झाल्यावर लोकप्रतिनिधीला कळालं की, "गाढव आणि बकऱ्यानं फसवलं!"
त्यांनी तात्काळ मीडियासमोर खुलासा केला –
"हे व्हायरल पत्र माझं नाही. सही पण खोटी आहे. घोड्याबरोबर माझं काही वाकडं नाही !"
लोकप्रतिनिधीचा यूटर्न पाहून बकरा हादरला.
गाढव तोंडात पाय घालून उभा राहिला.
आणि बकऱ्याचं काय झालं?
त्याला लोकप्रतिनिधीच्या माणसांनी कापून टाकलं!
बकरा तर गेला, पण गाढव पुन्हा एकदा तोंडावर आपटलं.
गाढवाचं फजितीमय पुनरागमन उकिरड्यावर
लोकांनी पाहिलं – गाढव पुन्हा उकिरड्यावर येऊन बसलंय, तोंड गाळीत खुपसून.
घोडा मात्र शांतपणे शर्यतीत पुढे पळत राहिला.
तात्पर्य:
गाढव आणि बकऱ्यानं कितीही कटकारस्थान रचलं, तरी घोड्याचं घोडेपण कधीच कमी होत नाही.
गाढव गाढवच राहणार, आणि बकरा बकराच!
घोड्याच्या वेगापुढे गाढवाचे नाटके कधीच टिकणार नाहीत!
टिप्पणी पोस्ट करा