धाराशिवमध्ये एक नवा तमाशा सुरू झाला होता. शर्यतीत सतत जिंकणाऱ्या घोड्याकडून एका बड्या साहेबाने लाथ खाल्ली आणि त्यांना घोड्याचा प्रचंड राग झाला. आता घोड्याचा काटा काढायचा तर काय करायचं? मग साहेबांनी तीन गाढवांपैकी एक हुशार गाढव निवडलं.
गाढवाचा सन्मान सोहळा!
साहेबांनी गाढवाला बंगल्यावर नेलं.
- खाऊ-पिऊ घातलं.
- बंगल्या वरच्या गालिच्यावर पाय ठेवायला लावला.
- इतकंच काय, तर आपल्या बाळाला गाढवाच्या पाठीवर बसवलं!
पाठीवर बाळ बसल्यावर गाढवाला वाटू लागलं की, "मी घोड्यापेक्षा महान! आता साहेबही माझ्या बाजूला आहेत!"
गाढवाच्या डोक्यात विचार येऊ लागले. "आपण आता साहेबांचे विश्वासू आहोत. घोडा काय चीज आहे?"
साहेबांची योजना आणि गाढवाचा उत्साह
साहेबांनी गाढवाला सांगितलं –
"अरे गाढवा, तूच आता घोड्याला हरवू शकतोस. लोकांना सांग, घोडा फसवा आहे!"
गाढव उत्साहाने कामाला लागलं.
- चॅनलवर घोड्याच्या विरोधात बातम्या!
- सोशल मीडियावर ट्रेंड – #DonkeyPower #BanHorse
- घोड्यावर खोटे आरोप – "तो आपल्याला लाथा मारतो!"
गाढवाला वाटू लागलं की, "आता माझा जमाना आलाय!"
साहेबही खुश होते, कारण गाढवाने घोड्याच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं.
गाढवाचे स्वप्न फिसकटले!
पण घोडा शांत राहिला. लोकांना समजलं की, "गाढव काहीही करून घोड्याचं घोडेपण हिरावू शकत नाही!"
साहेबांचे प्रयत्न फोल ठरले. शेवटी साहेब हताश झाले आणि सोलापूरला निघून गेले.
नवीन साहेब आणि गाढवाची फजिती
गाढव सांभाळणारे साहेब गेल्यावर बंगल्यावर नवीन साहेब आले. त्यांनी बंगल्याच्या दारातच गाढवाचं स्वागत केलं – दंडुके मारून!
गाढवाने विचार केला – "अरे, हे काय नवीनच? आता तर मी साहेबांचा लाडका होतो!"
पण नवीन साहेबांना गाढवपण अजिबात खपलं नाही. त्यांनी गाढवाला लाथा घालून बंगल्याबाहेर हाकलून दिलं.
गाढवाला शेवटी कळून चुकलं की, "साहेब कोणताही असो, गाढव गाढवच राहतो आणि घोडा घोडाच!"
घोड्याच्या जिद्दीपुढे गाढवाचा कट काहीही कामी आला नाही.
तात्पर्य:
गाढव कितीही मिरवू देत, बंगल्यावर हवेहवेसे वाटू देत – शेवटी त्याचं गाढवपण काही जात नाही. आणि घोड्याचा वेग कधीही थांबत नाही!
टिप्पणी पोस्ट करा