शरद पवारविषयी आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही

आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला... 


ठाणे  - शरद पवार बरोबर आमच्या पण भावना आहेत मात्र आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. 


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार साहेबांनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळी आम्हाला देखील अश्रू अनावर झाले होते याची आठवण करून देतानाच सारखे - सारखे अश्रू आणून जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील असे वाटत नाही अशी मिश्किल टिप्पणीही आनंद परांजपे यांनी केली. माझ्याकडे पक्षाने ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्यामागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही भूमिका असल्याचे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती मी घेईन. निवडणुकीत पडणारी मते ही पक्षाची ताकद असते त्यामुळे त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न असल्याचेही आनंद परांजपे म्हणाले. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संघटनेचे पद द्या अशी मागणी केली होती हे सांगतानाच आता निवडणूक आयोगात लढाई सुरु झाली आहे. चिन्ह, पक्षाबाबत जी भूमिका घ्यायची ती भूमिका निवडणूक आयोग घेईल असेही आनंद परांजपे यांनी सांगितले. 


Post a Comment

Previous Post Next Post