फोन पे अँप येस बँकेचे आहे का ? ( व्हायरल चेक )

फोन पे अँप येस बँकेचे असल्याची अफवा गेले काही दिवस  पसरली होती, त्यामुळे अनेकांनी आपल्या स्मार्ट फोन मधून हे अँप डिलीट केले होते. परंतु सत्य काय समोर आले ते तुम्ही नक्की वाचा.. 
येस बँकेवर  निर्बंध लादल्यामुळे ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वात मोठा फटका बसला होता तो म्हणजे ‘फोन पे’  या अ‍ॅपला. येस बँक UPI पार्टनर असल्यामुळे फोन पे ला मोठा तोटा सहन करावा लागला.
बँकिंगच्या सेवांसाठी फोन पे येस बँकेचा वापर करत असे. येस बँक फोन पे साठी ‘पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणून काम पाहायची. मात्र निर्बंध लागल्यानंतर खूप वेळासाठी फोन पे  अ‍ॅपवरून कोणतेच व्यवहार होत नव्हते. यासंदर्भात ‘फोन पे’ अ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी यांसदर्भात संयम राखण्याचं आवाहन ग्राहकांना केलं होतं.
समीर निगम यांनी आणखी एक ट्वीट करत अ‍ॅपची सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली. आता आयसीआयसीआय बँक फोन पेची नवीन UPI पार्टनर असणार आहे.
  फोन पे अँप येस बँकेचे नसून त्याचे फक्त UPI पार्टनर होते. आता फोन पे ने  फोन पे  UPI  पार्टनर बदलले असून  फोन पे ची सेवा पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली आहे.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने