उस्मानाबादेत सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीबरोबर शिक्षकाचे  अश्लील चाळे 

जमावाने  बेदम चोप देत पोलीस स्टेशनला नेले 


उस्मानाबाद - शहरातील एका नामांकित शाळेत   एका शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे  करून गैरवर्तन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर एका जमावाने शाळेत जावून त्या शिक्षकास बेदम चोप दिला आणि शहर पोलीस ठाण्यात नेवून तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

उस्मानाबादेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य एका शिक्षकाने  केले आहे.  मोहन संपतराव सुरवसे ( वय ५० )  असे या शिक्षकाचे नाव आहे. तो सहावीत शिकणाऱ्या
बारा वर्षाच्या एका विद्यार्थिनीशी गेल्या काही दिवसांपासून  अश्लील चाळे  करून गैरवर्तन करत होता. आज सकाळी मुलगी घरी रडत आल्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेवून विचारले असता, तिने सदर शिक्षक गेल्या काही दिवसापासून मांडीवर घेवून बसवणे, नको त्या ठिकाणी हात लावणे, अश्लील चाळे करून गैरवर्तन करणे असे प्रकार करत असल्याचे समजले.
आरोपी मोहन सुरवसे 

त्यानंतर मुलीचे पालक आणि काही लोक जाब विचारण्यासाठी शाळेत गेले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पालकांनी त्यास शाळेतच चोप देवून पोलीस स्टेशनमध्ये मारत नेले. त्याच्यावर विविध गंभीर कलमानुसार गुन्हा नोंद करणे सुरु आहे.

मोहन सुरवसे हा वादग्रस्त शिक्षक असून मागे याच शाळेत बिल काढण्यासाठी एका स्कुल बस चालकांकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. त्यानंतर त्यास निलंबित करण्यात आले होते, मात्र पुन्हा कामावर घेण्यात आल्यानंतर हा नवा प्रताप केला आहे. तो एका स्थानिक वृत्तपत्राचा बातमीदार असल्याचे सांगून अनेकांना दमदाटीही करत होता. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने