पुणे - शहरातील कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाल्याने अधिक सजग राहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. ताज्या बातमीनुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापना कायदा लागू (Disaster Management Act ) केला असून पुण्यातील तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यात कोरोना बाधित 5 रुग्ण आढळून आल्याने भीती व्यक्त केली जात आहे. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनापासून खबरदारी म्हणून पुण्यातील तीन शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कात्रज, धायरी, नांदेड सिटीमधील तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.
खबरदारी म्हणून पुण्यातील या तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. कात्रज, धायरी, नांदेड सिटीमधील (प्रत्येकी) तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. संक्रमण थांबवणे हा मुख्य हेतू असून यामध्ये वैयक्तिक काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. संक्रमण थांबविण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील 2 प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या ओला टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला. टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा