कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित...

कोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे. 

 भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 67 वर पोहोचली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा रुग्ण आहे. पुण्यात आठ, मुंबईत दोन रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. अशाप्रकारे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अकरावर पोहोचली आहे.  

 फ्रान्स, जर्मनी, स्पेन नागरिकांचा व्हिसा रद्द

 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारताने तीन देशांच्या नागरिकांना भारतात प्रवेशण्यासाठी तात्पुरती बंदी घातली आहे. यामध्ये फ्रान्सजर्मनी आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. या देशातील नागरिकांना सध्या भारतात येण्याची परवानगी नाही. अजूनपर्यंत देशात दाखल न झालेल्याप्रवेश न केलेल्या फ्रान्सजर्मनी आणि स्पेनमधील नागरिकांच्या नियमित आणि ई-व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे.   

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

कोरोनाची लक्षणे कोणती आहेत ?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.

कोरोनाबाबत काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.

कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने