वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी वारिस पठाण यांना पुन्हा एकदा नोटीस

"15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!" असं वादग्रस्त विधान करणारे MIM चे नेते वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांकडून दुसऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या 8 मार्चपर्यंत पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे.


गुलबर्गा येथील एका सभेत एमआयएमचे वारिस पठाण यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. ‘100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागले’ असं विधान त्यांनी केलं होतं. या विधानावरुन त्यांना पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना पोलिसांनी 29 फेब्रुवारीला हजर राहण्यास संगितले होते. मात्र ते हजर न राहिल्याने पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. 

वादग्रस्त विधान केल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्याविरोधात कारवाई केली. वारीस पठाणला मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मीडियाशी बोलता येणार नसल्याचं ओवेसींनी म्हटलं होतं.

दरम्यान, हक-ए-हिंदुस्तान या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी वारीण पठाणला देशद्रोही म्हटलं होतं. देशभरात वारिस पठाण यांच्यावर टीका करण्यात आली होती. हक-ए-हिंदुस्तान मोर्चा या मुस्लीम संघटनेने त्यांच्याविरोधात घोषणा केली होती. वारिस पठाण याचा शिरच्छेद कराहे करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा या मुस्लीम संघटनेने केली होती. यावेळी मुजफ्फरपूर येथील कंपनी बाग रोडवर मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारिस पठाण याचा पुतळाही जाळला होता.

Post a Comment

Previous Post Next Post