बाजारात आलेय करोना विमा कव्हर

बंगलोरमधील एका स्टार्टअप विमा कंपनी - डिजीट इन्शुरन्स ने करोना साठी विमा योजना सादर केली आहे. कदाचित भारतात करोना विमा कव्हर देणारी ही पहिलीच कंपनी असावी. डिजीटल विमा अंतर्गत बिलांशिवाय विमाधारकाला निश्चित लाभ मिळू शकणार आहे.डिजीट कंपनी कॅनडातील अब्जाधीश प्रेम वास्वा यांनी २०१६ मध्ये सुरु केली असून करोना कव्हर देणारी ही पहिली कंपनी आहे असा दावा केला जात आहे.    


हा विमा २९९ रुपये प्रीमियम पासून सुरु होत आहे. गरज आधारित विमा कव्हर नावाने हा विमा मिळणार आहे. एखाद्याचा करोना तपासणीचा रिपोर्ट पोझिटिव्ह असला तरी किंवा तपासणी करण्याची गरज असलेल्या लोकांना यातून कव्हर मिळू शकेल. पॉलिसीधारक यात १०० टक्के क्लेम करू शकतील.  
करोना लागण झाल्याच्या संशयावरून ज्यांना वेगळे ठेवले जाईल त्यानाही यात ५० टक्के क्लेम मिळू शकणार आहे. या विम्याखाली २५ हजारापासून २ लाखांपर्यंत कव्हरेज मिळणार आहे. तपासणी निगेटिव्ह आली तरी विमाधारक किंवा स्क्रीनिंग तपासणी मध्येही विमाधारक ५० टक्के क्लेम दावा करू शकतील.
देशात करोना रुग्णांची संख्या २९ वर गेली असताना इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरीटी म्हणजे इर्डाने सर्व विमा कंपन्यांना करोना कव्हर होऊ शकेल अश्या पॉलिसी विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून डिजीटने ही पॉलिसी सादर केली आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post