किरोन पोलार्ड ठरला ५०० टी २० खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू

वेस्ट इंडीजचा तुफानी अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्डने टी २० मध्ये नवे रेकॉर्ड बनविले असून ५०० टी २० खेळणारा तो जगातील पाहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या रेकॉर्ड मध्ये आंतरराष्ट्रीय तसेच लीग सामने सामील आहेत .

पोलार्डच्या ५०० टी २० मध्ये एक शतक४९ अर्धशतके असून ४९९ सामन्यात त्याने ९९६९ धावा ३०. ८५ च्या सरासरीने ठोकल्या आहेत. त्यात ६४४ चौकार६५० षट्कार असून २८७ झेल त्याने घेतले आहेत. त्याचा बेस्ट स्कोर १०४ आहे. गोलंदाजीत त्याने १७९ विकेट घेतल्या आहेत. 
  
श्रीलंकेविरुध्द दोन टी २० सामन्याचा मालिकेतील पहिला सामना खेळण्यास पोलार्ड मैदानावर उतरला तेव्हाच त्याने हे रेकॉर्ड केले. अगोदर पोलार्डने टी २० चा ३०० वा सामना४०० वा सामना सर्वप्रथम खेळणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव नोंदविले आहेच पण आता ५०० वा टी २० खेळणाराही तो पहिला खेळाडू बनला आहे. ब्रावोच्या नावावर ४५४ तर क्रिस गेलच्या नावावर ४०४ टी २० सामने आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post