आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नरेश गोयल यांच्या घरावर ईडीची धाड

जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्या खंबाला हिल येथील घरावर अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)  धाड टाकली आहे. नरेश गोयल यांचा मनी लाँड्रींग प्रकरणात समावेश असल्याच्या संशयामुळे ईडीने त्यांच्या विरोधात ही कारवाई केली आहे.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. त्याआधी बुधवारी सकाळी ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते. कर वाचवण्यासाठी नरेश गोयल यांनी देशातील आणि पदेशातील कंपन्यांमध्ये देवाण-घेवाण केली होती. तसेच पैसा देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. आणि आता आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. अजूनही गोयल यांच्या घराची ईडीचे अधिकारी झडती घेत असल्याचे वृत्त आहे.

ईडीने यापूर्वी फेमा अंतर्गत दिल्ली आणि मुंबई येथे 12 ठिकाणी तपासणी केली होती. जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांच्या घरांचा त्यात समावेश होता. गोयल यांच्या विविध 19 कंपन्यांची माहिती या तपासणीमध्येच समोर आली होती. यातील कंपन्यांची नोंदणीही झालेली आहे.


 नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी 25 मे 2019 ला लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण या दोघांच्या विरोधात लूक आउट नोटीस निघाल्यामुळे त्यांना तत्काळ विमानातून उतरवून पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. या कंपन्यांवर नरेश गोयल अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने