
कमर्चारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्ट यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत चालू आर्थिक वर्ष २०१९-२० मधील पीएफवरील व्याज दरावर निर्णय घेण्यात आला. सरकार या वर्षीच्या कमाईशी झगडत आहे. कर महसूल आणि निर्गुंतवणूक दोन्हीकडून मिळणारे उत्पन्न लक्ष्यापेक्षा कमी आहे. आर्थिक मंत्रालयाचा पीएफसह इतर सगळ्या छोट्या बचत योजनांवरही व्याजदर घटले जाईल, असा दबाव होताच.
आता २०१९-२० या वर्षीसाठी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर ८.५० टक्के व्याज मिळेल. त्यामुळे कमर्चारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सातशे कोटी रुपयांची बचत होईल. जर जास्त व्याजदर लावले असते तर २०१८-१९ या मागच्या आर्थिक वर्षात व्याजदर ८.६५ टक्के मिळत होते. हा निर्णय नुकतीच झालेल्या केंद्रीय ट्रस्ट बोर्डाच्या बैठकीत घेतला गेला आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाने पीएफवरील व्याज दराबाबत निर्णय घेतला असून या निर्णयाला अर्थ मंत्रालयाने सहमती देण्याची गरज आहे. देशात ईपीएफओच्या पीएफ योजनेत तब्बल ६ कोटी कर्मचारी जोडलेले आहेत.
ईपीएफओने मार्च २०१९ शेवटी आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज दर जाहीर केले होते. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ईपीएफओने आपल्या भागधारकांना ८.५५ टक्के व्याज दिले होते. यावर्षी ईपीएफओने सर्वात कमी म्हणजे ८.५५ टक्के व्याज दिले होते. तर २०१६-१७ मध्ये ईपीएफवर व्याजदर ८.६५ टक्के होता. जेव्हा २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के व्याजदर मिळत होते. याप्रकारे २०१३-१४ आणि २०१४-१५ ईपीएफवर ८.७५ टक्के व्याज दिले गेले होते. २०१२-१३ मध्ये ईपीएफवर व्याजदर ८.५० टक्के होते.
Post a Comment