बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे माजी आमदार मेहता यांची न्यायालयात धाव

मुंबई - बलात्काराच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी  मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द करा, अशी विनंती करत त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. येत्या 9 मार्चला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

2014 सालानंतर याप्रकाराविरोधात आपण नरेंद्र मेहतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मेहतांची जवळीक असल्याने ते आपल्यावर दबाव टाकत होते. त्यामुळे आजवर तक्रार दाखल केला नाही, असा दावा पीडित नगरसेविकेने केला आहे. 

भाजपच्या नगरसेविकने माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविकेने केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून न्याय न मिळल्याने पोलिसांकडे धाव घेतल्याचं पीडित नगरसेविकेने म्हटलं आहे. त्यामुळेचे आपण आमदार नरेंद्र महेतांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबियांना जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोप नीला सोन्स यांनी केला आहे. 

नीला सोन्स यांनी स्वत: मेहता यांचं स्टिंग आॅपरेशन केलं होतं. हा व्हिडीओ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवून देखील दखल न घेतल्यानं नीला सोन्स नाराज होत्या. अखेर त्यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. नीला सोन्स या मीरा-भाईंदरमधील प्रभाग क्रमांक 10 अ च्या नगरसेविका आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने