विद्या चव्हाण यांच्या सुनेचा आरोप , मुलीपासून तोडले, बेघर केले ..

मुंबई - नातू हवा म्हणून सुनेचा छळ करणाऱ्या राष्ट्रवादी आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल  झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. विद्या चव्हाण यांनी प्रतिष्ठेपोटी आपणास गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाब टाकला, इतकंच नव्हे तर मुलीसपासून मला तोडले, बेघर केले असा आरोप त्यांच्या सुनेने केला आहे,

पहिली मुलगी झाल्यानंतर आमदार विद्या चव्हाण यांना मुलगा हवा होता, पण दुसऱ्यांदा मुलगी झाली, पण दुसऱ्या मुलीनंतर मला गर्भाशयात अडचणी निर्माण झाल्यामुळे तिसऱ्यांदा मूल होणे शक्य नाही. त्यास मी नकार दिल्यानंतर विद्या चव्हाण यांनी छळ सुरु केला, इतकेच नव्हे तर घराबाहेर धक्के मारून  हाकलून लावले, बेघर केले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे नाटे आरोप केले आहेत, पण इतके दिवस ते गप्प का होते ? माझ्या नावावर कसलीही प्रॉपर्टी नाही, घराबाहेर काढताना  कपडे सुद्धा दिले नाहीत. मला माझ्या वडिलांनी आधार दिला, नाही तर माझे खूप हाल झाले असते.


घराबाहेर हाकलून लागल्यानंतर माझ्या मुलीला मला भेटू दिले जात नाही, त्यासाठी न्यायालयात जावे लागले. माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे, असेही  विद्या चव्हाण यांच्या सुनेने सांगितले. 

विद्याताई, हे बोलणे बरे नव्हे !

राष्ट्रवादीच्या  फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्यात सुनेने पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या सुनेवर  गंभीर आरोप  केलाय. तिचे विवाहबाह्य संबंध होते,  असा थेट आरोप करून एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला बदफैली सिद्ध करू पाहत आहे. ते देखील केवळ तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून. अन्य राजकीय व्यक्तींनी स्त्री विषयक अनुद्गार काढले तर टीव्हीवर तासनतास भांडणाऱ्या विद्या बाई आता मात्र सरेआम आपल्याच सुनेच्या इज्जतीचे वाभाडे काढत आहेत.   


Video



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने