AnTuTu बेंचमार्किंग एपला Play Store वरून हटवले

Google Play Store  वर अशी कित्येक एप्स आहेत जी यूजर्स चा डेटा चोरण्याची कामे करतात. आणि अशा प्रकारची एप्स यूजर्सच्या दृष्टीने धोकादायक असू शकतात याच गोष्टीचा विचार करून Google वेळोवेळी आपल्या प्लॅटफोर्म वर बदल करत असते. एका ताज्या रिपोर्टनुसार लोकप्रिय बेंचमार्किंग  ज्याचे नाव  AnTuTu आहे या एपला Google Play Store  वरून हटवण्यात आलेले आहे परंतु गुगलने AnTuTu ला  का हटवले आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  

Android Police यांच्या माहितीनुसार, Google नी आपल्या सगळ्याच प्लॅटफोर्म वरून  Antutu प्स ना हटवलेले आहे. त्या हटविण्यात आलेल्या एप्स मध्ये Antutu 3DBench, Antutu Benchmark आणि Altutu Benchmark यांचा समावेश आहे.तसेच ह्या  Antutu च्या एप्सचा जास्त वापर Xiaomi  Realme च्या यूजर्स कडून होताना दिसतो. ह्या ए च्या मदतीने अपकमिंग स्मार्टफोन्स चे परफॉर्मेंस समजत होते शिवाय त्याला   Antutu चे रेटिंग दिले जात होते. दरम्यान वरील विशद केलेली तीनही एप्स Cheetah Mobile  शी संबंधित असल्याचे समजते.

दरम्यान AnTuTu ने Android Police च्या ई-मेल वर उत्तर देताना असे म्हंटले आहे की, आम्हांला मार्च रोजी Google कडून एक नोटिफिकेशन मिळालेले आहे की ज्यात असे म्हंटलेय, AnTuTu प Cheetah Mobile शी संबंधित आहे आणि त्याच्या सर्व एप्सना Google Play Store वरून हटवण्यात आलेले आहे. पण आम्हाला असं वाटतंय की काहीतरी गैरसमज झाला आहे कारण AnTuTu प Cheetah Mobile शी संबंधित नाही. आम्हाला आशा आहे की Google आता AnTuTu ची सर्व अकाउंट्स सावधानतेने तपासेल व लवकरात लवकर आमच्या बाबतीतील गैरसमज दूर करेल.

या सगळ्याआधी Forbes चा एक रिपोर्ट समोर आला होता ज्यात असे सांगितलेले की,  Clean Master ऐप हे यूजर्सचा डेटा चोरायचे काम करते. त्यामुळे साधारण दोन वर्षांपूर्वीच Play Store वरुन Clean Master  ला हटवले गेले होते. या एप संबंधित असे म्हंटले जायचे की हे एप हरतऱ्हेने युजर्सची वैयक्तिक वेब माहिती चोरायचे काम करत होते    

Post a Comment

Previous Post Next Post