जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे आणि कोरोनाचे सावट प्रत्येक क्षेत्रावर पडताना दिसत आहे. आणि आयपीएल याला अपवाद नाहीये. जवळपास 4 हजार लोकांना या व्हायरसमुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. या व्हायरसचा जगभरातील 80 हून अधिक देशात फैलाव झाला असून बुधवारपर्यंत भारतात कोरोनाचे ६१ रुग्ण आढळले, त्यामुळे आगामी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा (आयपीएल) होणार की नाही यावर साशंकता आहे. तरीही ही स्पर्धा रद्द करण्यात यावी, यासाठी आता मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याचे समजते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकृत्त संकेतस्थळावरील माहितीनुसार कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शोध लागलेला नाही. झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे.
केंद्र सरकारने यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे सामने खेळवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी बेंझीगर यांनी आपल्या याचिकेत केली आहे. बेंझीगगर यांनी आपल्या याचिकेत इटली फुटबॉल फेडरेशन लीगने देशात होणारे सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचेही म्हटले आहे.
दरम्यान, उद्या म्हणजेच गुरुवारी १२ मार्चला न्यायाधीश एमएम सुरेंद्र आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर बेंझीगर यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. याआधी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल पुढे ढकलण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे. तर कर्नाटकनेही आयपीएल स्पर्धा पुढे ढकला अन्यथा रद्द करा, अशी मागणी केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे .
IPL चे संपूर्ण वेळापत्रक
अनुक्रमे तारिख सामने आणि ठिकाण पुढीलप्रमाणे
- मार्च 29 मुंबई X चेन्नई मुंबई
- मार्च 30 दिल्ली x पंजाब दिल्ली
- मार्च 31 बेंगलुरु X कोलकाता बेंगलुरु
- एप्रैल 1 हैदराबाद x मुंबई हैदराबाद
- एप्रैल 2 चेन्नई X राजस्थान चेन्नई
- एप्रैल 3 कोलकाता X दिल्ली कोलकाता
- एप्रैल 4 पंजाब x हैदराबाद मोहाली
- एप्रैल 5 मुंबई X बेंगलुरु मुंबई
- अप्रैल 5 राजस्थान X दिल्ली जयपुर/गुवाहाटी
- एप्रैल 6 कोलकाता X चेन्नई कोलकाता
- एप्रैल 7 बेंगलुरु x हैदराबाद बेंगलुरु
- एप्रैल 8 पंजाब x मुंबई मोहाली
- एप्रैल 9 राजस्थान X कोलकाता जयपुर/गुवाहाटी
- एप्रैल 10 दिल्ली x बेंगलुरु दिल्ली
- एप्रैल 11 चेन्नई X पंजाब चेन्नई
- एप्रैल 12 हैदराबाद x राजस्थान हैदराबाद
- एप्रैल 12 कोलकाता X मुंबई कोलकाता
- अप्रैल 13 दिल्ली X चेन्नई दिल्ली
- अप्रैल 14 पंजाब x बेंगलुरु मोहाली
- अप्रैल 15 मुंबई X राजस्थान मुंबई
- अप्रैल 16 हैदराबाद x कोलकाता हैदराबाद
- अप्रैल 17 पंजाब x चेन्नई मोहाली
- अप्रैल 18 बेंगलुरु x राजस्थान बेंगलुरु
- अप्रैल 19 दिल्ली x कोलकाता दिल्ली
- अप्रैल 19 चेन्नई x हैदराबाद चेन्नई
- अप्रैल 20 मुंबई x पंजाब मुंबई
- अप्रैल 21 राजस्थान x हैदराबाद जयपुर
- अप्रैल 22 बेंगलुरु x दिल्ली बेंगलुरु
- अप्रैल 23 कोलकाता x पंजाब कोलकाता
- अप्रैल 24 चेन्नई x मुंबई चेन्नई
- अप्रैल 25 राजस्थान x बेंगलुरु जयपुर
- अप्रैल 26 पंजाब x कोलकाता मोहाली
- अप्रैल 26 हैदराबाद X दिल्ली हैदराबाद
- अप्रैल 27 चेन्नई X बेंगलुरु चेन्नई
- अप्रैल 28 मुंबई x कोलकाता मुंबई
- अप्रैल 29 राजस्थान x पंजाब जयपुर
- अप्रैल 30 हैदराबाद x चेन्नई हैदराबाद
- मे 1 मुंबई x दिल्ली मुंबई
- मे 2 कोलकाता x राजस्थान कोलकाता
- मे 3 बेंगलुरु x पंजाब बेंगलुरु
- मे 3 दिल्ली x हैदराबाद दिल्ली
- मे 4 राजस्थान x चेन्नई जयपुर
- मे 5 हैदराबाद x बेंगलुरु हैदराबाद
- मे 6 दिल्ली x मुंबई दिल्ली
- मे 7 चेन्नई x कोलकाता चेन्नई
- मे 8 पंजाब xराजस्थान मोहाली
- मे 9 मुंबई x हैदराबाद मुंबई
- मे 10 चेन्नई x दिल्ली चेन्नई
- मे 10 कोलकाता x बेंगलुरु कोलकाता
- मे 11 राजस्थान x मुंबई जयपुर
- मे 12 हैदराबाद x पंजाब हैदराबाद
- मे 13 दिल्ली x राजस्थान दिल्ली
- मे 14 बेंगलुरु x चेन्नई बेंगलुरु
- मे 15 कोलकाता x हैदराबाद कोलकाता
- मे 16 पंजाब x दिल्ली मोहाली
- मे 17 बेंगलुरु x मुंबई बेंगलुरु
टिप्पणी पोस्ट करा