नवी दिल्ली - Redmi Note 9 Pro हा अद्ययावत असा नवीन स्मार्टफोन उद्या म्हणजेच 12 मार्च रोजी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon पर लिस्ट होणार आहे. परंतु या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये लाँच होण्याआधीच लिक झाली आहेत . Redmi Note 9 Pro लाँच होण्यासाठी केवळ एकच दिवस बाकी राहिला असताना या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये तसेच तो कुठल्या रंगांत उपलब्ध होणार आहे अशी सगळीच माहिती जगासमोर उघड झाली आहे.
टिप्स्टर ईशान अग्रवाल याने त्याच्या ट्वीटर अकाउंट वर Redmi Note 9 Pro स्मार्टफोनच्या माहितीबाबत खुलासा केलेला आहे, त्यानुसार शाओमी कंपनी भारतीय बाजारात हा स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च करेल. एका ऑप्शन मध्ये 4GB रैम सहित 64GB इंटरनल मेमोरी मिळेल तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये 6GB रैम सोबत 128GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध होणार आहे. तर फोन हा ब्लू, व्हाइट आणि ब्लैक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, शाओमीच्या Redmi Note 9 Pro स्मार्टफोन मध्ये 6.67 इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल, स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सेंटिमिटर कोटेड रहाणार असून 20:9 आस्पेक्ट रेश्यो पहायला मिळणार आहे. कॅमेराच्या बाबतील म्हणाल तर Redmi Note 9 Pro ला 16MP चा पंच होल फ्रंट कॅमेरा असून क्वाड रियर कॅम रा सेटअप आहे. तसेच 48MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड एंगल, 5MP मैक्रो सेंसर तर एक डेप्थ सेंसर असणार आहे.
पावर बैकअप बाबतीत फोन ला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबतच 5020mAH ची बैटरी मिळणार आहे. मागील दिवसांत झालेल्या फोनच्या माहिती संदर्भातील लीकमुळे असा अंदाज बांधला जात आहे की, Redmi Note 9 Pro ला कंपनी MediaTek Dimensity 800 प्रोसेसर ने जगापुढे आणेल. खास गोष्ट ही आहे की हा स्मार्टफोन 5G सपोर्ट वर चालतो. परंतु आता अधिक माहितीसाठी मोबाईलप्रेमींना आता 12 मार्चचीच वाट पहावी लागेल.
टिप्पणी पोस्ट करा