चीनने बनवले 29 मिनिटांत समजू शकेल असे कोरोना चाचणीचे किट

जगभर कोरोना वायसर पसरत चाललेला आणि जगातील तमाम देश कोरोनाच्या प्रकोपाला घाबरुन आहेत तर काही ठिकाणी रूग्ण त्रासलेले आहेत अशा परिस्थितीत चीनच्या वैज्ञानिकांनी एक नवा शोध लावला आहे. जे नवीन किट तयार केले आहे त्याच्या सहाय्याने केवळ 29 मिनीटांत कोरोना वायरसची चाचणी करता येते, असा दावा हे शास्त्रज्ञ करत आहेत. या तयार केलेल्या किटला राष्ट्रीय चिकित्सा उत्पाद प्रशासनामार्फत एप्रुवल साठी पाठवण्यात आलेले असल्याचे समजते. ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार,  कोविड 19 एंटीबोडीच्या 29 मिनीटांच्या आत होणारे परिणाम पहाण्यास  सोबतच रॅपिच टेस्टिंग कीटला राष्ट्रीय चिकित्सा उत्पाद प्रशासनाकडून प्रतिपादन मिळालेले आहे.
ज़ियामेन विश्वविद्यालयाच्या नेतृत्वाखाली  एका संशोधकांच्या गटाने या 29 मिनीटात कोरोनाच्या चाचणी किटला तयार केलेले आहे. किटचा उपयोग clinical cases, suspected cases  आणि high-risk groups  अशा तीन प्रकारच्या केसेसचे स्क्रीनिंग  करण्यासाठी केला जाऊ शकतो. कोरोनावायरसने संक्रमित झालेल्या लोकांचे सॅंपल घेऊन त्याचे परिक्षण करायला या किटचा उपयोग होऊ शकतो. असे केल्याने रूग्णांना निदान लवकर समजेल त्यामुळे इलाजही तात्काळ करणे सोपे होऊ शकेल जेणेकरून त्या रुग्णांना लवकरात लवकर रिकव्हर होण्यास, तब्येत सुधारण्यास मदतच होईल.
किटची टेस्ट कोरोनावायरस चे केंद्रबिंदू असलेल्या वुहान प्रांतातील क्लीनिकमध्येच केलेली आहे, त्यानंतरच आम्ही केवळ 29 मिनीटांत कोरोनाची टेस्ट होईल अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो,  असे किट तयार करणाऱ्यांनी सांगितले. COVID-19 म्हणजेच कोरोनावायरस असण्यासाठी three antibody reagents ची आवश्यकता असते. या गोष्टीला युरोपीय संघाने एप्रुव केले आहे तसेच इटलीऑस्ट्रिया आणि नेदरलैंडसह अन्य देशांतही टेस्टचे किट निर्यात केलेले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने म्हंटले आहे की, जगभरातील अजूनही अनेक देश असे आहेत जे जीवघेण्या कोरोना वायरसला गंभीरतेने घेत नाहीत, खरेतर ह्या घडीला जगातील सगळ्याच देशांनी अधिक गंभीरतेने पहाण्याची आवश्यकता भासत आहे. कारण चीनमधून कोरोना वायरस तब्बल 85 हून अधिक देशांमध्ये यापूर्वीच पसरलेला आहे. आत्तापर्यंत एकूण 3,300  हून अधिक लोकांचे कोरोनामुळे जीव गेलेले आहेत तर कोरोनाने प्रभावित झालेल्यांची संख्या एक लाखापर्यंत पोहोचलेली आहे.  
डब्ल्यूएचओ प्रमुख ट्रेडोस अदनोम घेबरेसस यांनी सांगितले की असे अनेक देश आहेत तेथील राजकीय नेतृत्तवच कोरोनाबाबत पावले उचलण्यास वचनबद्ध नाहीत अथवा अत्यंत उदासिनता दर्शवत आहेत. आणीबाणी परिस्थितीत आक्रमकतेने तयारी दाखवणे जरूरी असते अशावेळी गरीब किंवा श्रीमंत राष्ट्र असा भेद उरत नाही. अमेरिका व युरोपातील काही रुग्णालयांनी कोरोनाबाबतच्या तयारीबाबत जी निष्क्रीयता दाखवली त्यावरून जागतिक आरोग्य संघटनेने ह्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत.
 एक हजार लोकसंख्येच्या वेटिकनमध्ये आणि हिमालयाच्या कुशीतील भूटानमध्येही कोरोनाचे प्रत्येकी एक रूग्ण आढल्याचे समजते. दरम्यान काही आकडेवारी पुढीलप्रमाणे
कोरोनापासून प्रभावित असलेले देश पुढीलप्रमाणे
देश– संक्रमित संख्या– मृतसंख्या
  • चीन - 80,552 - 3042
  • दक्षिण कोरिया - 6284 - 42
  • ईरान - 3513 - 124
  • इटली - 3858 - 148
  • जापान - 1066 - 12
  • अमेरिका - 180 - 12
  • फ्रांस - 423 - 07 

Post a Comment

Previous Post Next Post