येस बॅंकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार !

येस बॅंकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.कारण भारतीय रिझर्व बॅंक येस बॅंकेच्या खातेदारांना 50 हजार रुपये काढण्याचे लादलेले निर्बंध लवकरच संपुष्टात आणण्याची शक्यता आहे. येस बॅंकेच्या ग्राहकांना यापुढे 50 हजारापेक्षा अधिक रक्कम काढता येऊ शकेल असे टीव्हीवरील झालेल्या एका चॅनेलच्या मुलाखतीत रिझर्व बॅंकेचे अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले.

मार्च महिन्याच्या अखेरपर्यत कदाचित चालू आठवड्याचा शेवटीच 50 हजार रुपये काढण्याचे लादलेले निर्बंध संपुष्टात  आणून येस बॅंकेच्या ग्राहकांना 50 हजाराहून अधिक रक्कम काढता येऊ शकणार आहे. असे नियमात बदल केले तर नक्कीच यामुळे ग्राहकांना हायसे वाटू शकते. तसेच बॅंकेच्या ग्राहकांना अस्वस्थ रहाण्याचे अजिबात कारण नाही तुमचे पैसे सुरक्षितच आहेत त्यामुळे चिंतेची बाब नसावी.
लवकरच प्रतिबंध काढण्यात येतील आणि पूर्वीसारखे तुम्ही बॅंकेचे व्यवहार सुरळीत चालू ठेवू शकाल, आमच्यासाठी सेवा देण्याबाबत बॅंकग्राहक हा प्रथम आहे, शनिवार पासून येस बॅंकेच्या ग्राहकांना अन्य बॅंकाच्या एटीएमवरून पैसै काढू शकता येतील. आम्ही बॅंकीकच्या सुविधा सुरळीत चालू करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत, असे प्रशांत कुमार यांनी स्पष्ट केले.
येस बॅंकेच्या लाखो मतदारांमध्ये निर्बंध लादल्यापासून त्याबाबतच्या अफवा एकून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पण आता खुद्द रिझर्व बॅंकेनेच ट्विट करून ग्राहकांचा पैसा सुरक्षित असल्याची खात्री दिली यामुळे येस बॅंकेच्या ग्राहकांना दिलासा मिळालाय.
अंमलबजावणी संचालनालयाने येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना रविवारी सकाळीच अटक केली असून संध्याकाळी फसवणूक आणि भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात खटला भरला. दरम्यान लंडनला पळू पहाणाऱ्या राणाच्या मुलीला पोलिसांनी मुंबई विमानतळावर अडवले. राणा कपूरची 2,000 करोड़ रुपयांची गुंतवणूक, महागडी 44 पेटंटे अंमलबजावणी  संचालनालयाने   ताब्यात घेतले आहेत.

  

Post a Comment

Previous Post Next Post