कोरोनाच्या निर्मूलनासाठी 123 वर्ष जुना महामारी कायदा लागू

नवी दिल्ली - जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरस  जगात 118 ठिकाणी पसरलेला आहे, त्यामुळे आत्तापर्यत एकूण 4614 जण मरण पावले असून  १ लाख २५ हजार लोक  कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून  घोषित केले आहे. भारतातही कोरोना व्हायरस हळूहळू पाय पसरू लागला आहे.त्यामुळे  कोरोनाच्या  निर्मूलनासाठी 123 वर्ष जुना  महामारी कायदा पुन्हा  लागू करण्यात आला  आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी घोषित केल्यावर त्यापाठोपाठ केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली भारतातील अनेक राज्यांनी कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित केले. महामारी रोग कायदा 1897च्या अनुसार कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.महामारी रोग कायदा 1897 हा कायदा राज्य व केंद्र सरकारला महामारीचा प्रसार रोखायला मदत म्हणून अतिरिक्त कायदारूपी शक्ती प्रदान करतो.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व राज्यांनी सदर कायदा लागू करायला सुरूवात केली आहे. आणि हा आदेश पाळण्यात आला नाही तर तुरंगवासाची शिक्षा करण्याचा नियम आहे. हा कायदा काही वर्षांपूर्वी प्लेग रोग पसरु लागला होता त्यावेळी तयार करण्यात आला होता. जेव्हा एखादी महामारी रोखायला सामान्य नियम उपयोगी पडत नाहीत तेव्हा असा नियम अमलात आणण्यात येतो. यापूर्वी 2009 साली जेव्हा स्वाईन फ्लू ची साथ आली होती तेव्हा त्याला महामारी घोषित केले होते.

महामारी रोग कायदा 1897 कायद्यान्वये सरकार रेलवे किंवा इतर प्रवासाच्या माध्यमांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करू शकते. त्यातून संशयित आढळल्यास त्यांना सर्वांपासून विभक्त करून हॉस्पिटलला पाठवू शकतात, रोगाचे संक्रमण समाजात आणखी पसरू नये म्हणून कुठल्याही व्यक्तीला अटक करण्याची सवलत हा कायदा देतो.महामारी रोखण्याचे सर्वच उपाय जेव्हा अपुरे पडू लागतात तेव्हा महामारी रोग कायदा 1897 ह्याच कायद्याचे पालन करणे इष्ट ठरते.

महामारी रोग कायदा 1897 कायदा लागू झाल्यावर सरकारच्या आदेशांचे कुणी उल्लंघन करत असेल तर त्याला शासन देण्याचीही कायद्यात तरतूद आहे. आणि असे करणे आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महानिर्देशक टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, जगभरातील सगळ्यांच देशांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमण रोखण्यास काही पावले उचलली तर लवकरच जग कोरोनामुक्त होण्यास मदत मिळेल.


 कोरोना व्हायरस या महामारीमुळे ग्रासलेले प्रमुख दहा देश पुढीलप्रमाणे..

  • चीन (80981 प्रकरणे)
  •  इटली (12462 प्रकरणे)
  • ईराण (9000 प्रकरणे)
  •  रिपब्लिक ऑफ कोरिया (7983 प्रकरणे)
  •  फ्रांस (2281 प्रकरणे)
  • स्‍पेन (2140 प्रकरणे)
  •  जर्मनी (1567 प्रकरणे)
  • यूएसए (987 प्रकरणे)
  •  स्विजरलॅंड (815 प्रकरणे)
  • जपान (620 प्रकरणे)

कोरोनाच्या जाळ्यात अगदी सामान्य माणूस ते प्रसिद्ध व्यक्ती असे कुणीही अडकू शकते. स्‍पेनचे मंत्री आणि ब्रिटेनचे आरोग्य मंत्री आणि कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची पत्‍नी कोरोना व्हायरसने संक्रमित आहे, याशिवाय ईराणचे सर्वोच्‍च नेता अयातुल्‍ला खामनेई यांचे प्रमुख सल्लागाराचा कोरोनामुळेच मृत्यू झालाय

Post a Comment

Previous Post Next Post