गुगलकडून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना

जगभरातील १०० हून अधिक देशात करोना व्हायरस पोहोचलेला आहे. त्यामुळे ट्विटरने जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले असताना आता गुगलनेही आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना केल्या आहेत. गुगलच्या बेंगळुरू येथील एका कर्मचाऱ्यांना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येताच गुगलने सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

आमच्या बेंगळुरू येथील एका कर्मचाऱ्याला शुक्रवारी रक्तचाचणी करताना कोरोना व्हायरसच्या चाचणीचे निदान पॉझिटिव्ह आल्याचे आढळले. त्यामळे त्याला सर्वांपासून वेगळे ठेवत आम्ही त्याला ताबडतोब ऑफिसला न येता घरूनच काम करण्याचे सांगितले त्याचप्रमाणे कंपनीतील सगळ्याच कर्मचाऱ्यांना घरून काम पहाण्यास सांगितले.आम्ही स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सर्व खबरदारीच्या उपाययोजना करीत आहोत, असे गुगलने यावेळी स्पष्ट केले.

 जो कोणी त्या कर्मचार्‍यांच्या संपर्कात आला असेल त्याने ताबडतोब स्वत:ला अलग ठेवून (quarantine) आपल्या आरोग्याचे परिक्षण करावे, असे गुगलने आपल्या कर्मचार्‍यांना सांगितले. गुगलने आपल्या बेंगळूरु कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगितले आहे, दरम्यान देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव लक्षात घेता विप्रो, टेक महिंद्रा यांनीही रिमोट वर्क मॉडेल स्वीकारले आहे.

 यापूर्वी माइंडट्री आणि डेलचे दोन कर्मचारी कोरोना विषाणूसाठी सकारात्मक आढळले होते. कर्नाटकमध्ये सध्या कोरोना विषाणूच्या सहा घटनांची पुष्टी झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तो मेलेला 76 वर्षांचा कोरोना व्हायरसने संक्रमित झालेला संशयित रुग्ण कलबुर्गी येथील रहिवासी होता  ज्यापद्धतीने कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत तशी लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेक सावधगिरीची पावले उचलली आहेत.Post a Comment

थोडे नवीन जरा जुने