धाराशिवच्या पत्रकारितेत तीन गाढव अजूनही सक्रिय होती. पहिल्या भागात त्यांनी घोड्याला हरवण्यासाठी मोठे डावपेच आखले, पण लोकांनी त्यांना हसून उडवले. आता या गाढवांनी नवा प्लॅन आखला – "जे आपल्यासारखं नाही, त्याला संपवायचं!"
गाढवांची गुप्त सभा
गुप्त जागी मिटिंग झाली. पहिलं गाढव म्हणालं,
"आपण स्वतः काहीही करु शकत नाही, पण चांगले पत्रकार पुढे जाणं आपल्याला चालणार नाही!"
दुसरं गाढव बोललं,
"हो, आपण लोकांना दाखवायचं की, आम्हीच सगळ्यात हुशार आणि पॉवरफुल!"
तिसरं गाढव जे कायम पिऊनच असायचं, ते म्हणालं,
"आधी एखाद्यावर आरोप करू, मग त्याच्याविरोधात मोहीम राबवू!"
गाढवांचा काळा धंदा
हे गाढव स्वतः काळे धंदे करत. लाचखोरी, ब्लॅकमेलिंग, खोट्या बातम्या – या सगळ्यांत हे मास्टर होते.
👉 अधिकार्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत
👉 राजकारण्यांकडून खोटी पत्रे काढून कुणालाही फसवायचा प्रयत्न करत
👉 दररोज दारू पिऊन महिलांशी गैरवर्तन करत, पण स्वतःला प्रतिष्ठित पत्रकार म्हणवून घेत
👉 लोकांच्या मागे खोटे आरोप लावून त्यांच्या प्रतिमेचं मर्डर करत
चांगल्या पत्रकारांना संपवण्याचा कट
गाढवांना समजलं की, काही पत्रकार प्रामाणिकपणे काम करत आहेत. आता त्यांचं टार्गेट ठरलं –
1️⃣ त्यांच्याविरोधात खोटी तक्रार लिहायची
2️⃣ आमदारांकडून खोटे पत्र तयार करायचे
3️⃣ त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर खोटे आरोप करायचे
4️⃣ आपल्या टोळीला सांगून त्यांच्या प्रतिमेवर डाग टाकायचा प्रयत्न करायचा
पण शेवटी सत्य जिंकलं!
गाढवांनी मोठा कट रचला. त्यांनी अधिकार्यांसमोर मोठे मोठे कागद फडफडवले, मोठ्या आवाजात घोषणा दिल्या, पण कायद्याने काम करणारे पत्रकार शांत राहिले.
अखेर गाढवांचा कट उलटा पडला! लोकांना समजलं की, हे गाढव केवळ खोटेपणा करत आहेत. आणि मग…
🔹 गाढवांची सत्यासमोर धूळधाण झाली!
🔹 त्यांनी तयार केलेले खोटे पुरावे उलटे त्यांच्यावरच आदळले!
🔹 लोकांनी त्यांची खरी ओळख ओळखली आणि त्यांना हसून उडवलं!
शेवटी तात्पर्य:
❌ गाढव कितीही ताकदवान असल्याचा दावा करत असले तरी, शेवटी सत्याच्या वेगाने पळणारा घोडाच जिंकतो!
टिप्पणी पोस्ट करा