धाराशिवच्या तीन गाढवांच्या गोंधळाची कथा आता धाराशिवपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांच्या कुरापतींची माहिती बार्शी, उमरगा, लातूर, बीड अशा ठिकाणी पोहोचली. गाढवांची बातमी पसरताच तिथल्या लोकांनीही आपापल्या गाढवांचा शोध घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्यात अशीच दोन-तीन गाढवे असल्याचं समजलं.
गाढवांची संघटनबाजी – फूट आणि फुटपट्टी
धाराशिवच्या एका हुशार गाढवानं विचार केला, "आपलं गाढवपण असं एकट्यानं कसं चालेल? संघटन हवं!" आणि मग काय, एका गाढवानं गुपचूप एक संघटना बांधली.
पण दुसऱ्या दोन गाढवांनी याचा गंध घेतला आणि लगेचच त्यांनी स्वतःची स्वतंत्र संघटना उभारली.
आता जिल्ह्यात दोन गाढव संघटना उभ्या राहिल्या:
- पहिलं गाढव – एकाकी वीर संघटना
- दुसरं आणि तिसरं गाढव – संयुक्त गाढव मोर्चा
संघटन होताच फूट – गाढव विरुद्ध गाढव
संघटना स्थापन होताच, तीन गाढवांच्या मनात बेदिली निर्माण झाली. पहिलं गाढव एकीकडे निघून गेलं, तर उरलेली दोन गाढवे दुसरीकडे! आता युद्धाची तयारी झाली.
घोड्याला हरवण्यासाठी दोन्ही गट तयारीला लागले.
- पहिलं गाढव म्हणालं: "मी एकटा पुरेसा आहे, घोड्याला पाडण्यासाठी!"
- दुसरं गाढव बोललं: "आम्ही दोघे एकत्र आहोत, घोड्याला संपवूच!"
गाढविणीचा कट – विनयभंगाचा आरोप!
घोडा चपळ आणि वेगवान असल्यामुळे तो कोणाच्याही आरोपाखाली सापडत नव्हता. मग एका गाढवानं प्लॅन केला –
"काही गाढविणींना घेऊन घोड्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करु!"
गाढविणींच्या हातात फुलं देऊन, "घोड्यानं आमच्यावर अत्याचार केला!" असा दावा केला गेला.
- गाढविणी म्हणाल्या: "घोड्यानं आम्हाला ओलांडून गेलं, आम्ही घाबरून गेलो!"
- गाढव म्हणालं: "हा सरळ विनयभंग आहे!"
परिणाम – गाढव ते गाढवच!
वनविभागानं आणि लोकांनी हे सगळं ऐकलं आणि डोकं धरलं. चौकशी झाली. घोड्यावरचा आरोप "निराधार आणि हास्यास्पद" ठरला.
गाढवांनी घोड्याविरुद्ध कितीही षडयंत्र रचले तरी, शेवटी गाढव ते गाढवच ठरले!
फजितीची धूळधाण
गाढवांचे कट आणि आरोप सगळे पोकळ निघाले. लोक हसत होते आणि घोडा शांतपणे पुढे पळत होता.
धाराशिव, लातूर, बार्शी आणि बीड – सगळीकडे आता एकच चर्चा:
"गाढवाचं गाढवपण कुठेच जाऊ शकत नाही!"
तात्पर्य:
गाढव कितीही संघटना बांधू दे, आरोप करू दे, शेवटी गाढवपण त्यांच्यातून जात नाही. आणि घोडा तर वेगवानच राहतो – आरोपांच्या धुळीतही अभेद्य!
टिप्पणी पोस्ट करा