डॉलरच्या मूल्यात सुधारणेने सोने व बेस मेटलचे दर घसरले



मुंबई, १४ ऑक्टोबर २०२०: अमेरिकेकडून अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीबाबत अनिश्चिततेमुळे अमेरिकी डॉलरला बळकटी मिळाली. परिणामी मागील सत्रात सोने व बेस मेटलच्या दरावर परिणाम झाले. चीनकडून मागणीत वृद्धी दिसून आल्याने कच्च्या तेलाचे दर उंचावले. तथापि, जागतिक मागणीत फार सुधारणा नसल्याने नफ्यावर मर्यादा आल्या असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: अमेरिकेच्या डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्यावर दबाव आला. परिणामी सोन्याचे दर १.६ टक्क्यांनी घसरले व १८९०.८ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. कोरोना विषाणू मदतनिधी विधेयकाबाबत अनिश्चितता असल्याने अमेरिकी डॉलरचे मूल्य सुधारले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोना विषाणू मदत निधीवरील नव्या ऑफरनंतर डेमोक्रेट्स चिंतेत होेते.तथापि, अमेरिकी हाऊस स्पीकर नँसी पेलोसी यांनी संभाव्य कराराची अपेक्षा केली आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या औद्योगिक कामकाजात दमदार वाढ झाल्याने पिवळ्या धातूंच्या दरांवर दबाव आला. चीनमधील औद्योगिक कामकाजात वाढ झाल्याने विदेशातील मागणीही वाढली. परिणामी संतुलित आर्थिक सुधारणेची शक्यता दिसून आली. गुंतवणूकदारांची जोखिमीची भूक वाढल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला.

कच्चे तेल: डब्ल्यूीआय क्रूड तेलाचे दर २% नी वाढले व ४०.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. चीनकडून मागणीत वाढ झाल्याने अमेरिकी तेल उत्पादन प्रक्रियांतील वाढ झाकोळली गेली. चीनने सप्टेंबर २०२० मध्ये ११.८ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढी आयात केली. कार्गोने सीमाशुल्क वसूल केल्यामुळे ही वृद्धी वार्षिक वृद्धी १.७५ टक्के एवढी झाली. डेल्टा चक्रीवादळामु‌ळे आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेतील मेक्सिकोतील खाडीतील ऊर्जा उत्पादनात मोठा अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे तेलातील लाभही मर्यादित राहिला.

लिबियातील सर्वात मोठे शरारा तेल क्षेत्रातील कामकाज पुन्हा सुरू झाल्याने जागतिक तेल पुरवठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, मागणीतील घसरणीची चिंता अद्याप कायम आहे. यासोबतच, कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांवर पुन्हा लॉकडाऊन लादण्यात आल्याने कच्च्या तेलातील नफ्यावर आणखी मर्यादा आल्या. ओपेकने जागतिक मागणी वेगाने सुधारण्याबाबत नकारात्मक संकेत दिल्याने कच्च्या तेलातील नफ्यावर आणखी दबाव आला.

बेस मेटल्स: अमेरिकेच्या कोरोना विषाणू मदत निधीबाबतची आशा मावळत असल्याने एलएमईवरील बेस मेटलचे दर खालावले. तसेच अमेरिकी डॉलरला बळकटी मिळाल्याने चीनच्या मजबूत व्यापारी आकडेवारीवरील लक्ष विचलित झाले. परिणामी बेस मेटलच्या दरांवर दबाव आला.

सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या निर्यातीत सलग चौथ्या महिन्यात ९.९% वृद्धी दिसून आली. साथीमुळे झालेले लॉकडाऊन उठल्यामुळे आर्थिक कामकाज सुरू झाल्याने हे परिणाम दिसून आले. दरम्यान, याच कालावधीत चीनची आयात १३.२% नी वाढली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने