सोने, क्रूड आणि बेस मेटलचे दर घसरण्याची शक्यतामुंबई, १६ ऑक्टोबर २०२०: अमेरिकेतील कामगार बाजारपेठ कमकुवत पडल्याचे चिन्ह दिसू लागल्याने सोन्याचे दर वाढले. तथापि, अमेरिकेतील डॉलरचे मू्ल्य कायम असल्याने सोन्याचे दर घसरू शकतात. कोव्हिड-१९ चे वाढते रुग्ण आणि मागणीतील घसरणीमुळे कच्च्या तेलाचे दर घसरले. डॉलर कमकुवत असल्याने बेस मेटलवर संमिश्र परिणाम दिसून आले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: अमेरिकेच्या कामगार बाजारात उदासीनतेमुळे पिवळ्या धातूचे आकर्षण वाढले. परिणामी स्पॉट गोल्डचे दर ०.४% नी वाढले व ते १९२१.९ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. अमेरिकेतील नव्या बेरोजगारांची संख्या वाढल्याने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला साथीच्या आजाराचे परिणाम अजूनही भोगावे लागत असल्याचे दिसते. विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण अजूनही धोकादायक पातळीवर असल्याने आंतरराष्ट्रीय नाणे निधीने आगामी बाजाराबद्दल चिंता व्यक्त केली. परिणामी सोन्याच्या दरांना फटका बसला.

अमेरिकेचे चलन मजबूत झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी सोने फार आकर्षक ठरले नाही. नोव्हेंबर २०२० मधील निवडणुकीपूर्वी नव्या कोरोना मदत निधीची शक्यता कमी असल्याचे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्टीव्ही म्युचिन यांनी म्हटले. त्यानंतर डॉलरचे मूल्य वधारले. अतिरिक्त कोरोना व्हायरस मदत निधीबाबत अनिश्चिततेसह डॉलरची किंमत स्थिर असल्याने पिवळ्या धातूचे दर कोसळू शकतात.

कच्चे तेल: कोरोना विषाणूच्या वाढत्या केसेस आणि नव्या मदतनिधीबाबत अनिश्चिततेमुळे तेलाच्या अर्थकारणावर दबाव आला. डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाचे दर ०.२% नी घसरले व ते ४१ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. कोव्हीड-१९ ची दुसरी लाट आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांवर लॉकडाऊन स्थितीमुळे कच्च्या तेलाच्या मागणीत घट झाली व परिणामी दरही कोसळले.

यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या वृत्तानुसार, मागील आठवड्यात अमेरिकेच्या क्रूडसाठ्यात ३.८ दशलक्ष बॅरलनी घसण झाली. काही कार्गोंनी जकात शुल्क वसूल केल्यामुळे चीनची आयात १७.५ टक्क्यांनी वाढली व ती दररोज ११.८ दशलक्ष बॅरलवर पोहोचली. चीन तसेच जगातील टॉप तेल ग्राहकांकडून मागणी वाढल्याने क्रूडच्या दरांना आधार मिळाला. तथापि कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे तसेच ओपेक+च्या पुरवठ्यातही वाढ दिसून आल्याने क्रूडच्या अर्थकारणावर परिणाम दिसून आला.

बेस मेटल्स: नव्या कोरोना मदत निधीच्या आशेमुळे एलएमईवर बेस मेटलच्या दरांचे संमिश्र चित्र दिसून आले. अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्याने औद्योगिक धातूंच्या किंमतीवर दबाव आला. युरोझोनमध्ये कोव्हिड-१९ च्या प्रकरणांमध्ये धोकादायक वाढ झाल्याने अनेक देशांवर पुन्हा लॉकडाऊन लादण्यात आले. त्यामुळे विषाणूच्या विस्तृत प्रभावामुळे औद्योगिक धातूच्या अर्थकारणावर प्रभाव दिसून आला. आंतरराष्ट्रीय निकेल स्टडी ग्रुपने जागतिक निकेल मागणीत २०२० मधील २.३२ दशलक्ष टनांवरून २०२१ पर्यंत २.५२ दशलक्ष टनांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला. तसेच स्टेनलेस स्टीलची वाढती मागणी आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील उत्साहामुळे या धातूला आणखी आधार मिळण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post