मुंबई, १ सप्टेंबर २०२०: आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय, दूरसंचार आणि धातू समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. निफ्टीत ०.७३% किंवा ८२,७५ अंकांची वृद्धी झाली व ११,४००० अंकांची पातळी ओलांडत ११,४७०.२५ अंकांवर पोहोचला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.७१% किंवा २७२.५१ अंकांनी वाढून ३८,९००.८० अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात भारती एअरटेल (७.०९%), जेएसडब्ल्यू स्टील (६.५४%), हिंडाल्को (५.२६%), एशियन पेंट्स (४.४१%) आणि बजाज फायनान्स (४.३६%), ओएनजीसी (२.८७%) अॅक्सिस बँक (१.९६%), अदानी पोर्ट्स (१.३४%) आणि इन्फोसिस (१.५१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. निफ्टी मेटल हा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा निर्देशांक ठरला व ३.४१ टक्क्यांनी वधारला. बीएसई मिडकॅप १.१६% नी वाढला आणि बीएसई स्मॉलकॅपने ०.५४% ची वृद्धी घेतली.
अशोक लेलँड लि.: ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत ३१% ची म्हणजेच ६,३२५ युनिटची घट झाली. ऑगस्टमध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री ५,८२४ एवढी होती. घसरण होऊनही, कंपनीचे स्टॉक्स २.२२% नी वाढून त्यांचा ६९.१५ रुपयांवर व्यापार झाला.
अदानी पॉवर लि.: सर्वोच्च न्यायालयाने अदानी पॉवरला राजस्थानातून नुकसान भरपाई वसूल करण्याची परवानगी देणा-या एपीटीईएलच्या आदेशाचे समर्थन केले. आयातीत कोळशाची किंमत जास्त असल्याचे म्हटले. परिणामी, कंपनीच्या शेअर्समध्ये ४.३०% ची वाढ झाली व त्यांनी ३८.८५ रुपयांवर व्यापार केला.
एस्कॉर्ट्स लिमिटेड: कंपनीने ऑगस्ट महिन्यात वाहन विक्रीत वाढ झाल्याची नोंद केली. त्याच महिन्यात ट्रॅक्टर विक्रीत ८०% ची वाढ झाली. कंपनीची देशांतर्गत विक्री ७९.४% नी वाढली तर निर्यातीत ९०.४% ची वृद्धी झाली. परिणामी, कंपनीचे स्टॉक्स २.७०% नी वाढले व त्यांनी १,११७.०० रुपयांवर व्यापार केला.
रिलायन्स पॉवर लिमिटेड: कंपनीने मूळ आणि व्याजाच्या रकमेत डिफॉल्ट ३००.२२ कोटी रुपयांची नोंद केल्यानंतर रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअर्समध्ये २.९४% ची घट झाली व त्यांनी ३.३० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने काहीशी वाढ घेत ७२.८७ रुपयांचे मूल्य कमावले.
सोने: आंतरराष्ट्रीय स्पॉट दरांत सकारात्मक गती आल्याने एमसीएख्सवर पिवळ्या धातूंच्या किंमती वाढल्या. अमेरिकी डॉलरचा कमकुवतपणा आणि भारत-चीनमधील सीमा तणाव यामुळे एमसीएक्सवरील सोन्याच्या किंमतींना आणखी आधार मिळाला.
जागतिक बाजार: अमेरिका-चीनमधील वाढता तणाव आणि डॉलरचे घटते मूल्य यामुळे आशियाई आणि युरोपियन निर्देशांकांनी संमिश्र संकेत दर्शवले. नॅसडॅक ०.६८% नी वाढले, एफटीएसई एमआयबी ०.६९% नी वाढले. तर हँगसेंगच्या शेअर्समध्ये ०.०३% ची वाढ झाली. तर दुसरीकडे निक्केई २२५ आणि एफटीएसई १०० ने अनुक्रमे ०.०१% आणि १.१५% ची घट अनुभवली.
टिप्पणी पोस्ट करा