शेअर बाजारात गुंतवणूक करताना तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व



शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना शेअर्समध्ये गुंतवणूक करताना येणाऱ्या अडचणींची जाणीव असते. विशेषत: अस्थिरतेमध्ये आवश्यक माहितीचा अभाव असणे धोक्याचे ठरते. बाजार अस्थिर, अनिश्चित असताना, त्यातही गुंतवणूकदार चढ-उतारांचा अंदाज लावू शकत नसतानाची स्थिती आणखीच वाईट होते. अशावेळी बहुतांश गुंतवणूकदार नेहमीच त्याचे गुंतवणूकदार/पोर्टफोलिओ मॅनेजरच्या सल्ल्यानुसार बेटिंग करतात किंवा तज्ञांच्या अंदाजानुसार कृती करतात. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने, गुंतवणूकदार शेअर चार्ट्सचे ज्ञान मिळवू शकतात. त्यानंतर त्यांना शेअरमधील गुंतवणुकीची मोजकी जोखीम पत्करता येते. परिणामी त्यांना चांगले परतावे मिळतात.
ठराविक काळातील स्टॉक्सच्या किंमती आणि व्हॉल्यूममधील बदलांचा अभ्यास केल्याने भविष्यातील किंमतीचा अंदाज लावणे सोपे होते. तांत्रिक विश्लेषण हे अगदी १०० टक्के अचूकतेसह सर्वोत्कृष्ट निकाल देऊ शकणारे निश्चित साधन नसेल, परंतु जेव्हा इक्विटी बाजारपेठ अस्थिर असेल तेव्हा योग्य निवड करण्याकरिता हा मार्ग महत्त्वाचा आहे. गुंतवणूक करताना लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत, अशी तांत्रिक विश्लेषणाची काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:
१. शॉर्ट टर्म ट्रेडिंग: तांत्रिक विश्लेषण हे शॉर्ट टर्म ट्रेडर्सकडून वापरले जाणारे विश्वसनीय साधन आहे. गतिमान गुंतवणुकीसाठी सध्याच्या स्टॉक्सचा अंदाज लावण्यासाठी याची मदत होते. इतर वेळेच्या तुलनेत मर्यादित वेळेत स्टॉक्स खरेदी करणे, विक्री करणे किंवा स्वत:कडेच ठेवणे हे जोखीमदायक असते. बाजारातील पॅटर्न आणि ट्रेंडचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारची पद्धत किंवा साधन वापरल्यास जोखीमीवर नियंत्रण ठेवता येते. याव्यतिरिक्त, व्यापारी गुंतवणूकदारांना बाहेर काढण्यासाठी याचा वापर करतात. कारण यामुळे आशादायी स्टॉक्स ओळखणे आणि वेगाने निर्णय घेण्याचा लाभ मिळतो.
२. एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स: स्टॉक चार्ट्सचे विश्लेषण करून, गुंतवणूकदार शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठीचा एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सचा वेळ निश्चित करू शकतात. मागणी व पुरवठा समजण्यास याची मदत होते. तसेच ट्रेंड मोडण्यात व जास्त परताव्याची वेळ योग्यरितीने निर्धारीत करण्यास मदत होते. शेअर्सच्या अतिरिक्त तपशीलाने गोंधळलेल्या लोकांना तसेच निर्णयाची क्षमता नसलेल्यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे महत्त्वाचे संकेत सहजतेने मिळतात. तसेच गुंतवणुकदारांसाठी व्यापार करणे सोपे होते.
३. किंमतीच्या नमून्यांचे विश्लेषण: शेअर ट्रेडिंगमध्ये चतुराईने निर्णय घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून तांत्रिक विश्लेषणाद्वारे किंमतीचे प्रवाह कळाल्यास गुंतवणुकदारांना योग्य किंमतीत खरेदी किंवा विक्री करणे सोपे जाते. दरातील चढ-उताराचा अंदाज सोपा झाल्याने अधोमूल्यांकन आणि अतिमूल्यांकन टाळता येऊ शकते. संभाव्य उद्दिष्टे सादर करताना जलद प्रवृत्तीचे बदल ओळखणेही शक्य होते. काही पॅटर्न्सची पुनरावृत्ती होत असते, त्यामुळे गुंतवणुकदार माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात. जे तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत नाही, त्यांच्यापेक्षा सरस ठरू शकतात.
४. समर्थन आणि प्रतिकार पातळी: अशा परिस्थितीत, स्टॉक विक्री आणि खरेदीवरील अंदाज लावणे आणि त्यासंबंधी निर्णय घेणे कठीण असल्यामुळे स्टॉकची दर पातळी मर्यादित कक्षेच्या पुढे जाते. अशा वेळी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने स्टॉक चार्टमध्ये समर्थन आणि प्रतिकार पातळी ओळखणे सोपे जाते. त्यामुळे गुंतवणुकदाराला खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय घेण्यास योग्य पर्याय प्रदान करू शकते. एखादा विशिष्ट स्टॉक समर्थन किंवा प्रतिकार श्रेणीच्या पुढे असेल तर तो व्यापार करण्यायोग्य आहे. यातून चांगली स्थिती व मागणी दिसून येते.
५. ट्रेंड्सचे विश्लेषण: तांत्रिक विश्लेषण साधनाचा वापर असो वा सध्याचे शेअर बाजारातील ट्रेंड समजून घेणे, कोणत्याही गुंतवणुकादाराने सिस्टिममध्ये प्रवेश करण्यासाठी याची आवश्यकता असते. योग्य निर्णय घेण्यात, सध्याचे शीर्ष आणि विस्तृत मार्केट ट्रेंड्स समजून घेणे आवश्यक आहेत. तांत्रिक विश्लेषणामुळे स्टॉकची ऐतिहासिक, वर्तमान आणि एकूणच शेअरची वृत्ती आणि प्रकृती कळून येते. मग अपट्रेंड, डाऊनट्रेंड्स किंवा हॉरीझोंटल ट्रेंड्स असो गुंतवणूकदार चांगली खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेऊ शकतात.
६. दर आणि घनता विश्लेषणाचे मिश्रण: अखेरीस, दरातील चढ-उतार आणि घनतेचे एकत्रित विश्लेषण, यामुळे गुंतवणुकादाराला एखादा निर्णय चतुराईने घेण्यास मदत होते. कारण पुरवठा व मागणीतील चक्राचा दोन्ही घटकांवर परिणाम होतो. तांत्रिक विश्लेषणामुळे स्टॉक ट्रेंडच्या इतिहासाचे पुनरावलोकन करता येते. उदा. एखाद्या स्टॉकची किंमती वाढते आणि योगायोगाने ट्रेड व्हॉल्युमदेखील वाढतो, तो सकारात्मक ट्रेंड म्हणून ओळखला जातो. ट्रेड व्हॉल्युमने काहीशी वृद्धी घेतली तर तो रिव्हर्स ट्रेंड आहे, असे म्हटले जाते. या दोन्ही घटकाच्या संमिश्र अभ्यासाने गुंतवणुकादारांना पॅटर्न्स अधिक चांगल्या पद्धतीने समजणे सोपे जाते.
म्हणूनच, योग्य धोरणांनी गुंतवणूक करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण साधने ही स्टॉक चार्टचे एकूण मूल्यांकन आणि त्यांनंतरच्या व्यापाराच्या पर्यायांच्या वेळेतील उपलब्धतेबाबत फायदेशीर ठरू शकतात.
(श्री समित चव्हाण, मुख्य विश्लेषक, टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हज, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)

Post a Comment

Previous Post Next Post