वैद्यकीय प्रवेशाचा 70:30 फॉर्म्युला रद्द करा

आ.सतीश चव्हाण यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी



औरंगाबाद- राज्यात वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी गुणवत्ता असूनही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना 70:30 या फॉर्म्युल्यानुसार प्रादेशिक आरक्षणाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचा 70:30 हा फॉर्म्युला त्वरीत रद्द करावा अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

       मा.आ.सतीश चव्हाण यांनी नुकतीच मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन वैद्यकीय प्रवेशाच्या 70:30 फॉर्म्युला रद्द करण्यासाठी आपल्या उपस्थित त्वरीत बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. राज्यात वैद्यकीय प्रवेशासाठी 70:30 हा फॉर्म्युला सुरू केल्यामुळे मराठवाडा व विदर्भातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. मराठवाडाविदर्भ व उर्वरीत महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सं‘येमध्ये प्रचंड तफावत असून महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थी प्रवेश क्षमता यांचा विचार केला तर मराठवाड्याचा वाट्याला कमी जागा येत असल्याचे .आ.सतीश चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. 

उर्वरीत महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशासाठी जास्त जागा असल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना लाखो रू. भरून पश्चिम महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागत आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही एकच परीक्षा असताना सर्वांनाच समान संधी मिळाली पाहिजे. मग 70:30 हा फॉर्म्युला कशासाठीअसा प्रश्न उपस्थित करून 70:30 हा फॉर्म्युला त्वरीत रद्द करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी आग‘ही मागणी मा.आ.सतीश चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्याकडे केली. यापूर्वी देखील यासंदर्भात आ.सतीश चव्हाण वेळोवेळी शासनस्तरावर पाठपूरावा करीत आले आहे.

          यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करून सदरील प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देमशुख यांनी दिली असल्याचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post