अबब...13 वर्षांपूर्वीच झालेली कोरोनाच्या जन्माची भविष्यवाणी !

चीनने दुर्लक्ष करणे पडले महागात


चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या दहशतीने आता जवळपास संपूर्ण जगाचा ताबा घेतलेला आहे. कोट्यावधी लोकांना कोरोना विषाणूने अक्षरश: घाबरवून सोडले आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का, की हाँगकाँगच्या चार शास्त्रज्ञांनी 13 वर्षांपूर्वीच कोरोना विषाणूबद्दल (कोविड -19) चेतावणी दिली होती. परंतु शास्त्रज्ञांचे बोलणे त्यावेळी कोणी मनावर घेतले नाही उलट बोलण्याकडे कोणीही लक्षच दिले नाही. त्यामुळे आज जगामधील बहुतेक देशांना कोरोना विषाणूचा त्रास सहन करावा लागत आहे.

हाँगकाँगच्या चार शास्त्रज्ञांनी 13 वर्षांपूर्वीच संशोधन  करून एक रिसर्च रिव्ह्यू (Research Review)  सादर केला होता. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, लवकरच चीनच्या वन्यजीव बाजारातून सार्ससारख्या विषाणूचा जन्म होऊ शकतो. तथापि, एवढ्या मोठ्या धोक्याचा इशारा देऊनसुद्धा कुणालाही ते लक्षात आले नाही.
आता या संशोधनाचे संदर्भ पंजाब युनिव्हर्सिटी ऑफ इंडियानॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयपीईआर) या नामांकित संस्थांच्या शास्त्रज्ञांनी दिले आहेत. ते म्हणतात की जर याकडे  तेव्हाच गंभारतेने लक्ष दिले गेले असते तर आज संपूर्ण जगाला कोरोनामुळे जे भोगावे लागत आहे ही वाईट परिस्थिती उद्भवलीच नसती.

विषाणूवरील संशोधनातून माहिती उघडकीस आली

2 ऑक्टोबर 2007 रोजी हाँगकाँग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विसेन्ते सीसी चेंगसुसान्ना केपी लाऊपॅट्रिक सी वाय वू आणि कोव्हक यंग युएन यांनी संयुक्तपणे विषाणूबाबच्या  संशोधनाचा एक आढावा तयार केला. ज्यामध्ये विषाणूवरील संशोधनाचा संपूर्ण जगभरात आढावा घेण्यात आला. अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रो बायोलॉजी मध्ये हे प्रकाशित केले गेले होते.

चेतावणी गांभीर्याने न घेतल्याचा परिणाम

पंजाब विद्यापीठ चंदीगड येथील प्राध्यापक डीन सायन्सेसचे प्रिन्स शर्मा म्हणाले की, २००२-०3 मध्ये जेव्हा सार्स विषाणू आला होता तेव्हा त्याबद्दल शास्त्रज्ञांना इशारा देण्यात आला होताच. असे असूनही कोणत्याही सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही परंतु त्यांनी सर्वांनी ते हलक्यातच घेतले. पण अशा गंभीर विषयाला मागे टाकल्यामुळे आज प्रत्येक जण अस्वस्थ आहे.

Post a Comment

Previous Post Next Post