आंध्रप्रदेश पोलिसांची नवी शक्कल " कोरोना घोडा'" फिरवत जनजागृती !
भारतासह संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे.  देशभरात या प्राणघातक कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 1100 च्या वरती गेलेली आहे. यामुळेच केंद्र सरकारपासून राज्य सरकार पर्यंत सगळ्यांच चिंतेत वाढ झालेली आहे.

मंगळवारी देशभरातील 21 दिवसांच्या लॉकडाउनचा 7 वा दिवस आहे. असे असूनही  देशातील बर्‍याच भागातील लोक  लॉकडाउनकडे गांभीर्याने पहात नाही आहेत. तथापिपोलिस आणि प्रशासन त्यांना प्राणघातक कोरोना विषाणूची आपापल्या स्तरावर सतत जाणीव करुन देत आहेत. आंध्र प्रदेशातून एक मनोरंजक चित्र समोर आले आहे, येथे एक पोलिस (एपी पोलिस) घोडेस्वारी करत रस्त्यावरुन फिरत आहे ,पण ही घोडेस्वारी सामान्य घोडेस्वारी नसूनया पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या घोड्यावर कोरोना विषाणूचे  रंगीत  चित्र रेखाटलेले आहे. या रंगवलेल्या घोड्यावर स्वार होऊ हा पोलिस कर्मचारी लोकांनी अजिबातच घराबाहेर पडू नये यासाठी तो प्रोत्साहन देत आहे.

देशाच्या दक्षिणेकडील राज्यातून कोरोना बातम्यांबाबत एक चांगले चित्र समोर आले आहे. आंध्र प्रदेशाच्या कुर्नूल जिल्ह्यातील पीपेल्ली मंडल भागात मारुती शंकर नावाच्या एका उपनिरीक्षकाने लोकांना कोरोनाबाबत जागरूक करण्याचा एक अनोखा मार्ग सापडला आहे. कोरोना विषाणूने रंगविलेल्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होत मारुती रस्त्यावरून फिरत आहेत. या अनोख्या पद्धतीने मारुती लोकांना घर सोडू नका, कोरोना घराबाहेर वाट पहात आहे, त्याला भेटू नका तर घरीच रहा हे पटवून देण्याचा तो प्रयत्न करीत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये पोलिस कोरोना विषाणूच्या चित्राच्या हेल्मेटच्या माध्यमातून या प्राणघातक विषाणूबद्दल समाजात जनजागृती करत होते. पोलिसांच्या अशा उपक्रमांचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post