रविवार दि.22 मार्च रोजी संपूर्ण देशात कर्फ्यू


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे, येत्या रविवारी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींचे आवाहन

संकल्प आणि संयम या मार्गानेच कोरोनाच्या आव्हानाला सामोरं जाता येईल, असं सांगूनमोदी म्हणाले, 'मी देशवासियांकडून आज काही तरी मागणार आहे. जनतेनं कधीही मला निराश केलेलं नाही. कोरोनाशी मुकाबला म्हणजे, हा जनता कर्फ्यू आहे. येत्या रविवारी 22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे.
या काळात कोणीही घराबाहेर पडायचं नाही. त्यांनी दिवशी सगळ्यांनी घरी बसायचं. हा एक प्रयोग आहे. या अनुभवातून आपल्याला पुढचं आव्हान पेलण्यासाठी दिशा मिळेल. अत्यावश्यक सेवांशिवाय कोणीही त्या दिवशी घरातून बाहेर पडू नये. आतापासून सर्व स्वयंसेवी संघटना, संस्थांनी याबाबत जनजागृतीचं काम सुरू करायला हवं. हा कर्फ्यु यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी भारत किती तयार आहे. हेदेखील यातून स्पष्ट होईल.'

जनता कर्फ्यूमध्ये करायचं काय?

मोदी म्हणाले की, रविवारी, 22  मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे. ही आपली परीक्षा आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हे सुद्धा यातून समजेल असे मोदी म्हणाले. 

हॉस्पिटल, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत.  व्हायरस आणि देश यामध्ये ते आपले रक्षणकर्ते आहेत अशा लोकांप्रती कृतज्ञता म्हणून 22 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता लोकांनी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळ्या वाजवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असं मोदी म्हणाले.

Live

Post a Comment

Previous Post Next Post