रुग्ण, दिव्यांगाची तिकिटे वगळता रेल्वेकडून सर्वांची तिकिटे रद्द

भारतीय रेल्वेने 20 मार्चच्या मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दिव्यांग, रुग्णविद्यार्थी वगळता सर्वच तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसारकोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता रेल्वेने हा आदेश जारी केला आहे जेणेकरुन गाड्यांमधील अनावश्यक गर्दी नियंत्रित करता येईल.

सवलतीच्या दरात वृद्धांना तिकिट नाही
 रेल्वेने सादर केलेल्या आदेशात म्हटलेले आहे कीज्येष्ठ नागरिकांच्या अनावश्यक सहलींवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी पुढील सूचना येईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये सवलतीच्या दरात तिकिटे मिळणार नाहीत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका सर्वात पहिले वृद्धांनाच आहे.
 आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वृद्ध लोकांचीच संख्या सर्वाधिक आहे. एरवी रेल्वे 53 श्रेणींमध्ये सवलतीच्या दराने तिकिटे उपलब्ध करून देत असते परंतु या आदेशानंतर केवळ 15 प्रवर्गांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येणार आहे.

 प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमतही वाढवली
 इतकेच नाही तर आता रेल्वेने प्लॅटफॉर्मवरील अनाठायी गर्दी रोखण्यासाठीही पावले उचलली आहेत. रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीही वाढवल्या आहेत. देशभरातील 250 स्थानकांवर रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत 10 रुपयावरुन एकदम 50 रुपये अशी वाढ केली आहेत. दिल्ली विभागात 234 रेल्वे स्थानके असून या सर्वच स्थानकांवर वरील आदेश लागू करण्यात आला आहे.तसेच रेल्वेने प्रत्येक झोनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यात म्हटले आहे कीतापखोकलानाक वाहणे किंवा श्वास घेण्यास अडचण असलेल्या कर्मचार्‍यांनी कामावर येऊ नये.

 रेल्वेने 168 गाड्या रद्द केल्या
गुरुवारी रेल्वेने आणखीन  84 गाड्या रद्द केल्या आहेत ज्या 20 मार्च ते 31 मार्च दरम्यान चालणार नाहीत. यासह,रद्द झालेल्या गाड्यांची एकूण संख्या 168 वर पोहोचली आहे.
 कोरोना व्हायरसचा धोका आणि प्रवाशांची संख्या कमी ठेवायची असल्याने हे पाऊल उचलले गेले आहे. हा निर्णय 20 मार्च ते 31 मार्च पर्यंत लागू राहील. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये दोन तेजस एक्स्प्रेस आणि एक हमसफर एक्स्प्रेस ट्रेनचा समावेश आहे, या गाड्यांमध्ये तिकिट बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना त्याविषयी वैयक्तिकरित्या माहिती दिली जात आहे. तिकीट रद्द केल्यावर कोणतीही फी आकारली जाणार नाही. एवढेच नव्हे, तर रद्द झालेल्या तिकिटांचे 100 टक्के भाडे प्रवाशांना परत देण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने