सावरकरांची बदनामी करणाऱ्या टकलेंसह पाच जणांना जामीन

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात `दी वीक' या नियतकालिकात अवमानकारक वृत्त प्रसारित केल्याबद्दल लिखाण करणारे निरंजन टकले यांना आणि आणखी चार जणांना भोईवाडा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या 5 व्या न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांवर जामीन मंजूर केला. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जून 2020 या दिवशी निश्चित केली आहे. 


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात लिखाण केल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी लिखाण करणारे निरंजन टकले आणि दी वीकच्या व्यवस्थापनातील चारजणांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी मंगळवारी झाला. यावेळी सावरकर यांच्यावतीने अॅड. शरदकुमार मोकाशी यांनी जोरदार बाजू मांडली. त्यानंतर या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल न्यायमूर्ती श्री. एस. आर. नरवडे यांनी पाचही जणांना प्रत्येक 15 हजार रुपयांवर जामीन मंजूर केला. दरम्यान, या खटल्याकडे समस्त सावरकरांच्या अनुयायांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post