सावधान ! मोबाईलच्या अतिवापराने मनोरूग्ण व्हाल

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे घराघरांत मोबाईल धारक आढळतात, तेही सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन दिसतात. पण त्या मोबाईलचा अधिक वापर करताना त्याचा जीवनातील अनेक गोष्टींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मोबाईलमुळे जग जसे गतिमान होत आहे. त्याचप्रमाणे विविध आजारही लोकांना त्याच गतीने घेरताना दिसत आहे.
स्मार्टफोन वापरणा-या या मंडळींना मानसिक ताणमणक्याचे विकारमानेचे विकारस्वमग्नतासंवाद कौशल्याचा अभावएकलकोंडेपणानैराश्यासोबतच अचानक वजन वाढणेयासारख्या गंभीर आजारांची लागण केव्हा झाली हे लक्षातच येत नाही. हे आजार जेव्हा बळावतात किंवा त्रास होण्यास सुरू होतो तेव्हा ही मंडळी डॉक्टरांकडे धाव घेतात. या आजारांची लागण झालेल्या मुंलांमध्ये ९ ते २० वयोगटातील मुलामुलींचे प्रमाण मोठे आहे. 
  
अगदी मुलांच्या हट्टापासून सुटका करून घेण्यासाठीही आईवडील मुलांना स्मार्टफोन देतात. अलिकडची पिढी टेक्नव्ही असल्यामुळे अल्पावधीतच मोबाईलवर नियंत्रण मिळवतात. ते विविध प्रकारच्या गेम डाऊनलोड करतात अन त्यात तासनतास गढून जातात. अतिगेम खेळने आणि नेट सर्फिंगमुळे पैशांसकट वेळेचाही मोठा अपव्यय होतो. त्यामुळे पालक त्रस्त आहेतचपण शाळेतील शिक्षकही त्रस्त आहेत.

समाजातील मोकळेपणा इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे संपला असून समुहाने मनमोकळ्या गप्पा मारणारे लोक मोबाईलमंध्ये डोके खुपसून हाताच्या बोटावर जगाला साद घालू लागले. दरम्यान आपल्याला मोबाईलचे व्यसन कधी लागले हे कळलेच नाही. तरूणांना मुंबईसह अऩेक मोठ्या शहरांमध्ये मानसिक आजाराने विळखा घातला आहे. या आजारामागचे प्रमुख कारण मोबाईलचा अतिवापर हे असल्याचे पढे आले आहे.

मोबाईल ऍडिक्शनवर उपचार करू घेण्यासाठी थोडे थोडके नव्हे तर दररोज किमान २५ ते ३० रूग्ण येत असतात. यात सर्वाधिक संख्या ही तरूणाईची आहे. तसेचयातील सुमारे १० ते १२ जण हे मानसिक आजाराचे बळी असतात. दिवसाला ३० याप्रमाणे गणित केले तरमहिन्याला १३०० तर वर्षाला सुमारे १५६०० रूग्ण हे उपचारासाठी येतात. यातील विशेष असे कीमुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के लोकांना कधी ना कधी मोबाईल अॅडिक्शनमुळे मानसिक आजार होण्याची भीती असते. - डॉ. शुभांगी पारकर, केईएम, मुंबई   

Post a Comment

Previous Post Next Post