मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीवर गुन्हा

औरंगाबाद -  माजी आमदार व मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद टोकाला गेला आहे. जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी त्यांची सून व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्यावर शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. शनिवारी त्यांनी थेट औरंगाबादेतील क्रांती चौक पोलिस ठाणे गाठत ही तक्रार दाखल केली. त्यावरून संजना यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सून संजना हर्षवर्धन जाधव यांनीही रात्री सासू तेजस्विनी यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तेजस्विनी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी श्रीराम कॉलनीत ११ वाजता घरात असताना सून संजनाने किरकोळ कारणावरून मला शिवीगाळ करून धमकी दिली. तिच्या वागण्यामुळे जगणे असह्य झाले असून तिच्यावर कारवाई करावी. विशेष म्हणजे, हर्षवर्धन यांच्यावर काही दिवसांपूर्वीच एका पानटपरी चालकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post