यूएनच्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचे निर्देश

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील कर्मचार्‍यांना 16 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान घरून काम करणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस स्टीफन यांचे प्रवक्ते दुजारिक म्हणाले की, कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांची उपस्थिती अनिवार्य नसल्यास त्यांनी घरूनच काम करावे.

 कोरोनामुळे 43 हून अधिकांचा मृत्यू तर 1264 हून जास्त संक्रमित

कोरोनाच्या उद्रेकानंतर न्यूयॉर्क शहरातील आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुजारीक म्हणाले की, जोपर्यंत त्यांची शारीरिक उपस्थिती आवश्यक मानली जात नाही तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी फोनमार्गे कामकाजाच्या ठिकाणासोबत संपर्कात असावे. तीन आठवड्यांनंतर आम्ही इमारतीत कर्मचार्‍यांची कमीत कमी संख्या राखण्याबाबतचे मूल्यांकन करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत आतापर्यंत 43 हून अधिक लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालाय तर 1264 पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. ते म्हणाले की काही काळासाठी वेळेचा त्याग करणे नंतरच्या काळात फायदेशीर ठरेल, येणारे आठ आठवडे जरा कठिण काळ असू शकतो.

डिसेंबर 2019 च्या शेवटी, मध्य चीनमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित नवीन आजाराचा प्रादुर्भाव नोंदविला गेला, चा उद्रेक लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च रोजी त्याला महामारी म्हणून जाहीर केले. आता ११० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना संसर्गाची नोंद झाली आहे. सुमारे 134,000 लोक या कोरोना विषाणूमुळे बाधित आहेत. त्यातील 5,000, हून अधिक लोक  यामुळे मरण पावले आहेत.

 123 देशांतील 1,36,895 लोक कोरोनाने संक्रमित

 आतापर्यंत जगातील 123 देशांमधील 1,36,895 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे तर 5,077 लोक मरण पावले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी (14-मार्च -2020) सकाळी 8.30 पर्यंत ही आकडेवारी दर्शविली आहे.त्याच दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यव्यापी आणीबाणी जाहीर केली व डब्ल्यूएचओने यापूर्वीच कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे.

 आठ देशांमध्ये हजाराहून अधिक प्रकरणे

 संघटनेच्या म्हणण्यानुसार, आठ देशांमध्ये एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित प्रकरणे नोंदली गेलेली आहेत. कोरोना विषाणूची चीनमध्ये सर्वाधिक 80,981 प्रकरणे आहेत. इटलीमध्ये 15,113 प्रकरणे नोंदली गेली आहेत. इराणमध्ये 11,364 प्रकरणे समोर आली आहेत. कोरियामध्ये 7,979 प्रकरणे नोंदली गेली. स्पेनमध्ये 4,209 प्रकरणे समोर आली आहेत.जर्मनीमध्ये 3,062  प्रकरणे समोर आली आहेत तर अमेरिकेत 1,264 प्रकरणे घडली आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने