होळीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करा.. 


भारतीय संस्कृतीत दिवाळीप्रमाणे होळी हा सुद्धा एक महत्तवाचा सण साजरा केला जातो. ह्या होळीला शुभ संयोग  आहेत. होळीच्या दिवशीसुद्धा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाप्रमाणे लक्ष्मीली प्रसन्न करून घेतले जाते, तिचे पूजन करण्यात येते. ह्यावर्षी होळीच्या दिवशी गजकेसरी योग येत आहे  त्याचप्रमाणे ध्वज योग  सगऴ्याच राशिच्या लोकांसाठी शुभ संकेत आहे ज्याने होलिकादहनाच्या वेळी विविध राशीच्या लोकांना काही संकटे निर्माण होणार असतील तर ती होणार नाहीत.
होळीच्या मुहूर्ताला ते दोन योग आल्याने सर्व रोगांपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे तसेच  धन दौलत संपत्तीत अधिक वृद्धि होण्याचे संकेत आहेत. ग्रहांचे योगही चांगले असून ते लाभदायक ठरणार आहेत. होलिका दिनी शुक्र मेष राशिमंगल आणि केतु धनुराहु हा मिथुनसूर्य हा बुध, कुंभ  चंद्र सिंह राशीला असणार आहेत. ग्रहांना असा योग आल्याने ह्यावर्षीची होळी आणखीनच शुभ होणार असल्याचे म्हंटले जात आहे. 
पिवळ्या रंगाच्या राईपासून म्हणजेच मोहरीचा वापर करून होळीदेवतेला प्रसन्न करून घेतले जाते, म्हणूनच की काय होळीचे दहन करताना हवनात पिवळ्या मोहोरीचा वापर करतात कदाचित म्हणूनच लक्ष्मी प्रसन्न होऊन घरे धनधान्याने समृद्ध रहातात. याचसाठी दुपारी घरी होळीमातेचे पूजन करून रात्री दहन करण्याची परंपरा आहे तसेच काही गोष्टींचे दानसुद्धा करण्यात येते.
ह्यावर्षी होलिकामातेच्या पूजनाचा मुहूर्त सकाळपासून सूर्योद्य झाल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंतच आहे, कारण संध्याकाळी साडेसहा ते सात वीस पर्यत प्रदोष काळ आहे तर होळीपौर्णिमेचा मूहुर्त रात्री 11 वाजता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने