एक रुपयाने उघडले रामजन्मभूमी ट्रस्टचे बॅंक खाते   

रामजन्मभूमीत विराजमान रामलालाच्या भव्यदिव्य अशा मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे चालू खाते नुकतेच भारतीय स्टेट बैंकच्या अयोध्या शाखेत उघडण्यात आले जे मध्याह्नी 12 वाजून सात मिनटांनी जनरेट झाले. ट्रस्टचा पैन नंबर, खाते संचालकाची केवाईसीसाठी 25 फेब्रुवारी  रोजी बेकेत प्रस्तावित केले होते. खाते उघडण्यासाठीच्या औपचारिकतेला आवश्यक असे सर्वकाही प्राप्त झाल्यावरच बॅंकेच्या नियमानुसार  खाते सुरू केले गेले. शाखा प्रबंधक प्रियांशु शर्मा यांनी आणखी माहिती देण्यास नकार दर्शवला कारण सर्वकाही गोष्टी ह्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान अयोध्या मंदिराचे विश्वस्त व आरएसएसचे प्रांत कार्यवाह डॉ. अनिल मिश्र यांनी खाते उघडले असल्याचे स्पष्ट केले. मंदिरात भक्तांनी वाहिलेली रक्कम सध्या खात्यात जमा करण्यात येईल, देणगी दारांनी दिलेली पुंजी ठेवली जाणार नाही. तसेच भारत सरकारकडून आयकर विभागातर्फे दिल्या जाणार्या सूटीसंबंधित आवेदनपत्र दिले गेले आहे,त्यानंतरच देणगीदारंनी दिलेली पुंजी खात्यात जमा केली जाईल. अन्यथा यापूर्वीच देणगी दारांचे पैसे खात्यात जमा केल्यास आयकरावर मिळणारी सूट सरळ सरकारच्या तिजोरीत जाईल त्यामुळे देणगीदारांचे नुकसान झाले असते.

देणगीदारांना शंभर टक्के सूट मिळावी यासाठी 12 ए अंतर्गत 10(23सी)5  के च्या अंतर्गत प्रमाणपत्र साठी आवेदन केले गेले आहे ज्यामुळे ट्रस्टलाही आयकरात सूट मिळू शकेल तर 80 जी/ 35 एसी च्या अन्तर्गत भाविक देणगीदारांना दान करताना शंभर टक्के सूट मिळेल. या आयकर सूट मिळकतीबाबतच्या सर्व गोष्टी केंद्र सरकारने नवी दिल्ली स्थित चार्टेड एकाउन्टेंट, टैक्स अधिवक्ता कार्तिक श्री निवासन  यांच्या मदतीने ठरवलेल्या आहेत.

एसबीआय च्या अयोध्या शाखेत रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे चालू खाते औपचारिकरित्या भारत सरकार च्या एक रुपया ह्या करंसीने  उघडले. 1993  सालापासून रामलालाच्या खात्यात सुमारे  11 करोड़ची एफडी तसेच चालू खात्यातही लाखों रुपयांची धनराशि जमा आहे.

 शिवसेनेकडून एक कोटींचा निधी अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने