येस बॅंकेचा प्रश्न ऐरणीवर असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रथम सरकारची बाजू मांडली. मोठ्या संकटात असलेल्या येस बॅंकेने 2014 सालाच्या पूर्वीच अनेक मोठमोठ्या कंपन्यांना कर्ज देऊन ठेवलेले होते आणि हे जगात उघडचं आहे.
मी ग्राहक गोपनीयतेचे उल्लंघन करत नाही तरीही मी सांगू इच्छिते की येस बैंकेने अनिल अंबानी समूह, एस्सेल, डीएचएफएल, आईएलएफएस, वोडाफोन अशा आपत्तीत असलेल्या मोठ्या कंपन्यांना कर्ज देऊन ठेवले होते. मला याचा खुलासा अशासाठी करावा लागत आहे कारण विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून मला विचारले होते.
तसेच अर्थमंत्री म्हणाल्या की मी इकडे जुन्या गोष्टी उकरत नसून 2004 – 2014 या कालावधीत तत्कालिन सरकारने बॅंकिंग प्रणालित जी गडबड करून ठेवली आहे ती आमच्यासाठी गंभीर चुनौती आहे. त्यांना याबाबत दोषी ठरवण्याचे माझ्याकडे हे कारण आहे. सीतारमण यांनी पी चिदंबरम यांवर निशाना साधत म्हंटले की तत्कालिन स्व-नियुक्त सक्षम डॉक्टर सिंग सत्तेत होते ज्यांनी यूनाइटेड वेस्टर्न बैंकेला 2006 साली आईडीबीआई बैंकेत विलीन केले होते.
सीतारमण सांगत होत्या की, आज आमच्या समोर आईडीबीआई बैंकेची स्थिती निस्तरण्यातच खूप अडचणी येत आहेत. आज यूनाइटेड वेस्टर्न बैंकेच्या विलीनीकरणामुळे आईडीबीआई बैंक विशेष फायद्यात राहू शकत नाही.
टिप्पणी पोस्ट करा