इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेल ने व्होडाफोन - आयडिया, रिलायन्स जियोला मागे टाकले

टेलिकॉम कंपनी एअरटेल Airtel ने इंटरनेट डाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत व्होडाफोन - आयडिया  Vodafone-Idea आणि  रिलायन्स जियो Reliance Jio या   टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकलेले आहे. Tutela मोबाइल एक्सपीरियंस रिझल्टमध्ये   एअरटेल  Airtel ने  नेटवर्क क्वालिटी पासून ते सिग्नल स्ट्रेंथ, डाउनलोडिंग स्पीड च्या बाबतीत सर्वच  टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकलेले आहे.

रिलायन्स जियो Reliance Jio आणि बीएसएनएल BSNL  सगळ्याच बाबतीत पिछाडीवर असून  अपलोडिंग स्पीड च्या बाबत Vodafone-Idea ने बाजी मारलेली आढळली.Tutela ने हा सर्वे 1 औगस्ट 2019 पासून 31 जानेवरी 2020 च्या मध्ये कंडक्ट केलेला होता ज्यात  573 बिलियन रिकॉर्ड्स  मोजले गेले होते. यादरम्यान कंपनीने 65 मिलियन स्पीड टेस्ट व 900 मिलियन लेटेंसी टेस्ट केल्या, टेस्टच्या आधार वर  Tutela ने आपल्या रिपोर्टमध्ये  Tutela ने दावा केला आहे.  

 
Tutela ने आपला रिपोर्ट पाच वेगवेगळ्या भागांत विभाजित केला आहे. ज्यामध्ये एक्सैलेंट कंसिस्टेंट क्वालिटी (Excellent Consistent Quality), कोर कंसिस्टेंट क्वालिटी (Core Consistent Quality), डाउनलोड थ्रूपुट (Download Throughput), अपलोड थ्रूपुट (Upload Throughput), लैटेंसी (Latency ) या पाच गोष्टी आहेत. Excellent Consistent Quality मध्ये Airtel ने टॉप स्पॉट  प्राप्त केलाय, Airtel ची नेटवर्क क्वालिटी ही Jio व Vodafone-Idea पेक्षा 10  टक्क्याने चांगली आहे.Core Consistent Quality मध्येही Airtel दूसऱ्या स्थानावर असून ते Jio पेक्षा 3.6 टक्यांनी चांगले आहे.

डाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत  Airtel चा एवरेज डाउनलोडिंग स्पीड  7.4Mbps असून Vodafone-Idea चा एवरेज डाउनलोडिंग स्पीड 6.5Mbps आहे व अनुक्रमे Airtel पहिल्या व Vodafone-Idea दुसऱ्या स्थानी आहेत.  एवरेज डाउनलोडिंग स्पीडबाबत  Reliance Jio 5.3Mbps तिसऱ्या क्रमांकावर आणि BSNL 2.9Mbps चौथ्या क्रमांकावर आहे. 
अपलोडिंग स्पीड च्या बाबतीत Vodafone-Idea चा दबदबा कायम  आहे, Vodafone-Idea 3.7Mbps एवरेज अपलोडिंग स्पीडसोबत प्रथम क्रमांकावर आहे.तर Airtel 3.5Mbps दुसऱ्या, Jio 3.2Mbpतिसऱ्या व BSNL 1.7Mbps   चौथ्या स्थानी आहे,Airtel 26.2ms लैटेंसी रेट सोबत पहिल्या स्थानी व   Jio 28.2ms  दूसर्या स्थानी आहे. 
  

Post a Comment

Previous Post Next Post