जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं म्हणत, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला होता.
खासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता.
उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलपर्यंत तहकूब करत सर्व प्रतिवाद्यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. जात पडताळणी समितीकडे आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधीच मिळाली नसल्याचे डॉ. शिवाचार्य यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.
टिप्पणी पोस्ट करा