कोरोनाच्या भीतीमुळे महाराष्ट्रातील विपश्यना केंद्रही बंद


महाराष्ट्राच्या नाशिकमधील विपश्यना केंद्र पाच दशकात पहिल्यांदाच बंद ठेवण्याची वेळ आली आहे कोरोना व्हायरसच्या दहशतीने नाशिकमधील हे विपश्चना केंद्र अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने तशी नोटीस बजावल्याने केंद्राने परदेशी नागरिकांसोबत भारतीय साधकांचे ही कोर्सेस अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत.

दरम्यान देशविदेशातील साडेपाचशे साधकांनी १ तारखेच्या कोर्ससाठी नोंदणी केली होती. त्यात परदेशातून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाहीतोपर्यंत विपश्यना केंद्र बंद करण्याचे निर्देश दिलेत.  

सदर विपश्यना केंद्राच्या प्रशासनानं याबाबत दिलगिरी व्यक्त केलीये. जिल्हा प्रशासनाने आम्हाला मध्यरात्री नोटीस बजावली त्यामुळे आज सकाळपासून आम्ही सर्व कोर्सेस बंद करत आहोत धोरणाचा परिणाम असेल तोपर्यंत बंदरातील जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे पुढील कोर्सेस सुरू होतीलयामुळे साधकांची निराशा झाली असली तरी कोरोना रोखायचा असेलतर असे उपाय योजले पाहिजेत असे विपश्यना केंद्राचे मुख्य व्यवस्थापकांनी सांगितले.

ज्या ज्या ठिकाणी परदेशी पर्यटक येत आहेत किंवा गर्दी होत आहे त्या त्या सर्व ठिकाणांना आम्ही गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे, त्यात विपश्यना केंद्राचाही समावेश असतो असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  

भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढला असून आता महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांचा प्रवेश झालेला आहे. हे रुग्ण दुबईवरून परतल्याचे समजतेकरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग’ केली जात आहे. त्यांचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे फार्म भरून घेतले जात आहेत.  

Post a Comment

Previous Post Next Post